Shani Dev : 25 मार्चपासून 'या' राशींना येणार चांगले दिवस; शनीची चाल ठरणार फलदायी
Saturn Transit 2024 : नवीन वर्षात शनि आपली राशी बदलणार नाही, परंतु एकाच राशीत आपली हालचाल बदलत राहील. मार्चमध्ये शनीचा उदय झाल्यावर 3 राशीच्या लोकांना चांगले दिवस येतील.

Saturn Transit 2024 : नवीन वर्ष 2024 मध्ये शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार नाही. परंतु या वर्षी शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीतच आपली हालचाल बदलत राहील. 2024 मध्ये शनीच्या हालचालीत तीन वेळा बदल होतील, ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. कुंभ राशीमध्ये स्थित शनीचा फेब्रुवारीला अस्त होईल आणि मार्चला उदय होईल, त्यानंतर जूनमध्ये शनि उलटी चाल चालेल.
शनीच्या बदलत्या चालीला विशेष महत्त्व आहे. 2024 मध्ये शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 06:43 वाजता कुंभ राशीत शनिदेवाचा अस्त होईल. त्यानंतर 25 मार्च 2024 रोजी, सोमवारी सकाळी 05:08 वाजता शनिदेवाचा उदय होईल. याचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी विशेषत: 3 राशींवर शनीचा शुभ प्रभाव राहील, या काळात त्यांचं आयुष्य बदलेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना मार्चमध्ये शनीचा उदय झाल्यावर लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमधील सर्व कामं चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या बॉसचा आणि सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा लाभेल. तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू संपतील. या काळात तुमच्या परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीची ग्रहस्थिती आल्यावर खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. मित्राच्या मदतीने जीवनातील अडचणी दूर होऊ लागतील. तूळ राशीच्या लोकांना शनीच्या चालीमुळे खूप फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी कराल. या वर्षात तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील.
वृषभ रास (Taurus)
शनीची बदलेली चाल वृषभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देईल. तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली राहील. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमान्स कायम राहील. व्यावसायिकांचे प्रश्न आपोआप सुटू लागतील. तब्येतीत चढ-उतार असतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
