Guru Pushya Yog 2024 : जानेवारीत खरेदीसाठी, मंगल कार्यांसाठी 'हा' दिवस खास! बनतोय गुरू पुष्य योग; जाणून घ्या तारीख
Guru Pushya Nakshatra 2024 : जानेवारीत अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यानुसार लवकरच गुरु पुष्य योग देखील बनत आहे. हा दिवस खरेदी, मालमत्तेतील गुंतवणूक, व्यवसायाशी संबंधित काम आणि लक्ष्मीपूजेसाठी अतिशय शुभ आहे.
Guru Pushya Nakshatra 2024 : गुरू पुष्य योग हा फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं, त्यावेळी गुरू पुष्य योग तयार होतो. हा दिवस फार शुभ मानला जातो. या दिवशी कुठलंही काम केल्यास त्यात यश प्राप्त होतं. गुरू पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात. 2024 सालचं पहिलं पुष्य नक्षत्र खूप खास आहे, कारण ते गुरुवारी येत आहे आणि त्यामुळे गुरु पुष्य योग जुळून आला आहे.
शास्त्रानुसार, पुष्य नक्षत्रात लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य माणूस देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी, नवीन घर, नवीन वाहन खरेदी करू शकतो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यावसायिक व्यवहार, सोने-चांदी खरेदी, मालमत्ता खरेदी इत्यादींसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुरु पुष्य नक्षत्राच्या प्रभावाखाली केलेलं कार्य नेहमीच यशस्वी होतं, असं मानलं जातं. जानेवारी 2024 मध्ये गुरु पुष्य नक्षत्र केव्हा आहे, त्याची तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
गुरु पुष्य नक्षत्र 2024 तारीख (Guru Pushya Nakshatra Date)
गुरु पुष्य नक्षत्र 25 जानेवारी 2024 रोजी आहे. हे नक्षत्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घराचं बांधकाम सुरू करण्यासाठी, मुंडन इत्यादी शुभ कार्यांसाठी शुभ मानलं जातं.
गुरु पुष्य योग 2024 मुहूर्त (Guru Pushya Yog Muhurta)
पंचांगानुसार, गुरु पुष्य योग 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:16 वाजता सुरू होईल आणि 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:28 वाजता समाप्त होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला खरेदी आणि शुभ कार्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल.
पुष्य नक्षत्राचे महत्त्व (Significance of Pushya Nakshatra)
पाणिनी संहितेत असं लिहिलं आहे, "पुष्य सिद्धौ नक्षत्रे सिद्धांते अस्मिं सर्वाणी कार्याणी सिद्धः।" म्हणजेच पुष्य नक्षत्रात सुरू झालेली सर्व कामं पूर्ण, सर्वांगीण आणि निश्चितच फलदायी असतात.
गुरु पुष्य नक्षत्र का खास? (Why is Pushya Nakshatra Special?)
पुष्य नक्षत्रावर गुरू आणि शनि यांचे अधिपत्य असते, त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि या नक्षत्रात जमीन, इमारती, रत्ने, सोने-चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे. गुरु पुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सूक्ताचे पठण करावे, यामुळे माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते, पैशाची कधीही कमतरता नसते. या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॅट बुक करणे फायदेशीर ठरते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kinkrant 2024 : आज किंक्रांत! आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी