(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : ऑगस्ट महिन्यात सूर्यदेव 'या' राशींच्या वाढवणार अडचणी; शनी-राहुसुद्धा देणार त्रास, आर्थिक स्थिती ढासळणार
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ऑगस्ट रोजी सूर्य संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी आपली स्वराशी म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Shani Dev : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार, ऑगस्ट महिना अनेक राशींचं नशीब बदलू शकतो. तर, काही राशीच्या लोकांना या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. कारण, या महिन्यात (Shani Dev) शनीसह राहुचा देखील अधिक प्रभाव असणार आहे. ज्यामुळे शनी (Lord Shani) आणि सूर्य आपापल्या राशीत समसप्तक योग जुळवणार आहेत. तर, सूर्य आणि राहु षडाष्टक योग जुळून आणणार आहेत. सूर्याचा शनी आणि राहू या दोन ग्रहांबरोबर विदारक योग जुळून आणणार आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तर, काही राशींच्या लोकांना या काळात सांभाळण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊयात समसप्तक आणि षडाष्टक योग कोणत्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ऑगस्ट रोजी सूर्य संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी आपली स्वराशी म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या चरणात असणार आहे. तर, राहु सहाव्या आणि आठव्या चरणात असणार आहे. यामुळे षडाष्टक योग जुळून आला आहे. हा योग फार अशुभ मानला जातो.
मेष रास (Aries Horoscope)
या काळात मेष राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची गरज आहे. या राशीत सूर्य पंचम भावात आणि शनी अकराव्या भावात आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या राशीच्या लोकांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. जर, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा विचार करुनच निर्णय घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या लोकांवर शनी आणि राहुची दृष्टी असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. छोट्यातलं छोटं काम करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. यामुळे या काळात तुमचा तणाव वाढेल. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही जास्त काळजी घेण्याची गरज आहे. व्यवसायात तुम्हाला अधिक प्रगती करावी लागेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ संकटाचा असणार आहे. तुमच्यामागे सतत संकटं येतील त्यामुळे तुम्हाला फार अस्वस्थ वाटेल. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामेही या काळात पूर्ण होणार नाहीत. तुमची आर्थिक स्थिती कमजोर असेल. तसेच या काळात कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवा. छोट्या -छोट्या गोष्टीवरून त्रागा करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :