Shani Dev : 'या' चुकांमुळे शनिदेव होतील क्रोधित! आयुष्यभर भोगावे लागतील संकट, आर्थिक तंगीचाही करावा लागेल सामना
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, असं सांगण्यात आलं आहे की, काही काम असे असतात जे केल्यास शनीदेव क्रोधित होऊ शकतात.

Shani Dev : हिंदू धर्ममान्यतेनुसार, शनिदेवाला सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. कर्मफळदाता शनी (Shani Dev) सर्वांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. असं म्हणतात की, शनीची कृपा ज्या लोकांवर असते अशा लोकांना आयुष्यात सुख-शांती आणि यश प्राप्त होते. पण जर शनीदेव एखाद्या व्यक्तीवर नाराज झाले तर त्या व्यक्तीला फार आव्हानांचा सामना करावा लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, असं सांगण्यात आलं आहे की, काही काम असे असतात जे केल्यास शनीदेव क्रोधित होऊ शकतात. जर तुम्ही चुकूनही ही कामे केलीत तर तुम्हाला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे असा कोणती कामे आहेत जी केल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात ते जाणून घेऊयात.
दुसऱ्यांवर अन्याय
शनीदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. शनी नेहमीच सत्य आणि न्यायाचीच बाजू घेतात. त्यामुळे जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला धोका देत असेल, कोणाचा हक्क हिरावून घेत असेल अशा लोकांवर शनी नाराज होतात. त्यामुळे या व्यक्तीच्या जीवनात आनेक समस्या येऊ शकतात.
मद्य आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन
शनीदेवाला सात्विक आणि शुद्ध जगणं आवडतं. मद्यपान, मांसाहारी पदार्थ यांसारख्या तामसिक भोजनाचा लाभ घेतल्यास शनीदेवाच्या नजरेत असे लोक फार चुकीचे ठरतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी हलका आहार आणि सात्विक भोजन किंवा तेलात तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा.
वडीलधाऱ्या आणि गुरुंचा अपमान
जे लोक वडीलधाऱ्या लोकांचा अपमान करतात. त्यांना चांगली वागणूक देत नाही. अशा लोकांवर शनिदेव नाराज होतात. त्यामुळे जर तुमच्यावर देखील शनीची कृपा राहावी असं वाटत असेल तर नेहमी वडीलधाऱ्या लोकांचा आदर करा. त्यांची सेवा करा.
कामात आळस
जे लोक कामात आळस करतात. किंवा मेहनत न करता फळाची अपेक्षा करतात अशा लोकांना शनी चांगली शिक्षा देतात. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात यश हवं असेल तर मेहनत करा आणि धैर्य ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















