Shani Dev : 'या' सवयींमुळे नाराज होतात शनि महाराज; करावा लागतो संकटांचा सामना, पाठी लागते ढैय्या आणि साडेसाती
Shani Dev : शनीच्या कृपेने व्यक्तीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. पण, शनीदेवाचा अपमान केल्यास तुमच्यावर अनेक संकटं येऊ शकतात.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व आठ ग्रहांमध्ये शनी (Shani Dev) ग्रहाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. जर कुंडलीत शनीची स्थिती कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनावर फार वाईट परिणाम होतो. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
शनीदेवाला न्यायदेवता म्हणतात, शनीच्या कृपेने व्यक्तीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. पण, शनीदेवाचा अपमान केल्यास तुमच्यावर अनेक संकटं येऊ शकतात.
'या' गोष्टींमुळे शनिदेवाचा अपमान होतो
- ज्या लोकांचा हेतू दुसऱ्यांचं वाईट बघण्याचा असतो, दुसऱ्यांचं सुख ज्यांना बघवत नाही अशा लोकांना शनि महाराज दंड देतो.
- कोणी आपल्यापेक्षा पुढे जासत असेल तर त्याला प्रोत्साहन न देता त्याची दिशाभूल करणे.
- आपल्या परिस्थितीला, स्वत:ला समजून, सांभाळून घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते अशा लोकांवर शनिदेव नाराज असतात.
- जे लोक आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडतात. आपल्या चुकांचा स्वीकार करत नाहीत. अशा लोकांवर शनी महाराज खुश नसतात.
- जे लोक वाईट काम करतात अशा लोकांना शनी कधीच माफ करत नाहीत.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















