Guru Asta 2025 : अवघ्या 24 तासांत 'या' 3 राशी थेट 'सातवे आसमान पर'...गुरु ग्रहाच्या अस्ताने नशिबाला लागणार 'टर्निंग पॉईंट'
Guru Asta 2025 : गुरु ग्रह बृहस्पती 12 जून 2025 रोजी संध्याकाळी 07 वाजून 37 मिनिटांनी अस्त होणार आहे. तर, 9 जुलै पर्यंत तो याच अवस्थेत असणार आहे.

Guru Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु (Jupiter) ग्रह बृहस्पतीला सर्वात शक्तिमान ग्रह मानला जातो. गुरु ग्रह वर्षातून एकदा राशी परिवर्तन करतात. मात्र, यंदा गुरु ग्रह दुप्पट वेगाने चाल चालणार आहेत. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे. तर, ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत असणार आहे.
गुरु ग्रह बृहस्पती 12 जून 2025 रोजी संध्याकाळी 07 वाजून 37 मिनिटांनी अस्त होणार आहे. तर, 9 जुलै पर्यंत तो याच अवस्थेत असणार आहे. गुरुच्या या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या सहाव्या चरणात गुरु ग्रहाचा अस्त होणार आहे. त्यामुळे या राशीसाठी हा काळ फार अनुकूल असेल. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये शिक्षणात चांगला विकास दिसून येईल. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर विचारपूर्वक पैसे गुंतवा. तसेच, या काळात कोणाबरोबरही पैशांची देवाण-घेवाण करु नका. मुलांच्या करिअरबाबत तुम्हाला थोडी चिंता सतावू शकते.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या तिसऱ्या चरणात गुरु ग्रह विराजमान आहे. जो खरंतर चांगला मानला जात नाही. मात्र, गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. तुमच्या जीवनातील नकारात्मकता हळुहळू दूर होईल. तसेच, भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. तुमची ठरवलेली कामे तुम्ही नियोजित वेळेत करु शकता.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















