एक्स्प्लोर
Samudrik Shastra About Nails : नखांवरून जाणून घ्या तुमचे भविष्य
Samudrik Shastra About Nails : नखांचं सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का की हे नखे आपले संपूर्ण व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगतात.
Samudrik Shastra About Nails : नखं आपल्या हाताचं सौंदर्य वाढवतात. परंतु, नखांचं सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का की हे नखे आपले संपूर्ण व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगतात. प्रत्येक व्यक्तीसाठी नखे वेगवेगळ्या आकाराची असतात. नखांवर काही चिन्हं देखील असतात. या चिन्हांवरून व्यक्तीचा स्वभाव समजतो.
- जर एखाद्या व्यक्तीची नखे पिवळी असतील तर त्यांच्यात लैंगिक भावना कमी असते. अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या पाहायला मिळतात.
- नखे वाकडी व रेषा असलेली असतील तर अशा व्यक्तीला पैशाची कमतरता भासते. त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- ज्या लोकांच्या नखांना डाग लागलेले असतात, त्यांना पोट भरण्यासाठी इतरांची सेवा करावी लागते. ते इतरांवर अवलंबून असतात.
- ज्यांची नखे वरच्या बाजूस गुळगुळीत आणि चमकदार असतात ते लोक खूप भाग्यवान असतात. असे लोक नेहमी उच्च पदावर काम करतात.
- ज्या लोकांच्या नखांवर पट्टे असतात ते नेहमीच दुःखी असतात. त्यांच्यात विवेकाचा अभाव आहे. हे लोक लहानसहान गोष्टीवर नाराज होतात.
- जर एखाद्या व्यक्तीच्या नखांवर पांढरे ठिपके असतील तर त्याचे वर्तन चांगले नसते. हे लोक अनेकदा दबून जीवन जगतात.
- ज्यांच्या अंगठ्याच्या नखांवर काळे डाग असतात ते प्रेमात आंधळे असतात. प्रेमात फसवणूक केली तर बदला घेण्यात मागे राहत नाही.
-
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement