Pitru Paksha 2024 : एकवेळ उपाशी राहा, पण पितृपक्षात खाऊ नका 'या' 5 भाज्या; ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Pitru Paksha 2024 : शास्त्रानुसार, पितृपक्षात या भाज्या अजिबात खाऊ नये आणि पितरांनाही दाखवू नये, अन्यथा पितृदोष निर्माण होतो आणि पितर नाराज होतात. असं केल्याने घरावर संकटांचा डोंगर ओढावतो आणि कोणत्याच कामात यश लाभत नाही.
Pitru Paksha 2024 : हिंदू धर्मात पितृ पक्षाला मोठं महत्त्व आहे, हा 16 दिवसांचा कालावधी आहे जो पूर्वजांना समर्पित आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात पितरांना शाक भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच पूर्वजांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु या काळात काही भाज्या खाऊ नये, असं म्हणतात आणि त्या पितरांनाही दाखवू नये.
पितृपक्षाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. या काळात मांसाहार आणि मद्यपान टाळावं, अन्यथा पितर नाराज होतात आणि घरावर संकट ओढावतं. याशिवाय पितृपक्षात काही भाज्यांचं सेवन टाळावं. पितृ पक्षात (Pitru Paksha 2024) काही भाज्यांचं सेवन केल्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं, या भाज्या नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कंदमुळं खाऊ नका
हिंदू धर्मानुसार, जमिनीखाली तयार होणार्या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये. कंदमुळांमध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. श्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये. पितरांना देखील कंदमुळांचा नैवेद्य दाखवू नये, अन्यथा पितरांच्या रोषाला सामोरं जावं लागतं.
कांदा-लसूण खाऊ नये
शास्त्रात म्हटलं गेलंय की, प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होतो. पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं. जेवणात सतत लसूण-कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा, चिडचिड वाढते. शास्त्रानुसार, धार्मिक विधीसाठी तयार होणार्या जेवणातही कांदा-लसूण यांचा वापर निषिद्ध आहे, म्हणूनच पितृपक्षात कांदा-लसूण खाणं टाळावं.
मसूर डाळ खाऊ नये
पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये. तुम्हाला वडे वैगेरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता, परंतु मसूर डाळीचा वापर करू नये.
चणे खाऊ नये
पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे. श्राद्धाच्या जेवणात चण्यांचा, चण्याच्या डाळीचा वापर करू नये. पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी, चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं.
मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं
हिंदू धर्मातील प्रथेनुसार, पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे. दारू पिणं, विडी-सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं या गोष्टीही पितृपक्षात निषिद्ध आहे. त्यामुळे हा नियम पाळावा, अन्यथा घरावर संकटं ओढावतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...