(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pisces Horoscope Today 2 May 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, कौटुंबिक जीवनात सुख-शांती; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Pisces Horoscope Today 2 May 2023 : मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल.
Pisces Horoscope Today 2 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला सन्मान मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारचा समावेश करा. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय अनुकूल राहील. आज शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला खूप आनंद होईल.
गुंतवणुकीतून फायदा मिळेल
मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. बांधकामाशी संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कुटुंबियांसोबत वेळ घालवा
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी मध्यम स्वरुपाचा असू शकतो. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. असे केल्याने तुम्हाला फायदाही होईल. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सुरुच ठेवल्यास तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 72 टक्के तुमच्या बाजूने असेल.
आजचे मीन राशीचे आरोग्य
मीन राशीच्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करु नका. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन राशीसाठी आज उपाय
नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 शुक्रवारपर्यंत हे व्रत करत राहा.
मीन राशीसाठी आजचा शुभ रंग
मीन राशीसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :