Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर नेहमीच असतो बजरंगबलीचा आशीर्वाद; प्रत्येक संकटाचा अगदी धैर्याने करतात सामना, हा लकी नंबर नेमका कोणता?
Numerology : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या देव किंवा ग्रहाशी संबंधित आहे.
![Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर नेहमीच असतो बजरंगबलीचा आशीर्वाद; प्रत्येक संकटाचा अगदी धैर्याने करतात सामना, हा लकी नंबर नेमका कोणता? Numerology people born on this date are blessed by lord hanuman know this lucky number or moolank Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर नेहमीच असतो बजरंगबलीचा आशीर्वाद; प्रत्येक संकटाचा अगदी धैर्याने करतात सामना, हा लकी नंबर नेमका कोणता?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/f852508040653bcf5144141d1431da741716874873546358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा भगवान हनुमानाच्या (Lord Hanuman) पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. आज 2024 या वर्षातील पहिला मोठा मंगळ (Budhwa Mangal) आहे. हा मोठा मंगळ हा नेहमी ज्येष्ठ महिन्यात येतो. वर्ष 2024 मध्ये, ज्येष्ठ महिन्यात एकूण 4 मोठे मंगळ दिसून येतील. तसेच, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या देव किंवा ग्रहांशी जोडलेली आहे. संबंधित आहे. त्यामुळे कोणत्या जन्मतारखेच्या (Numerology) लोकांवर भगवान हनुमानाची कृपा असते? हा मूलांक (Moolank) नेमका कोणता आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
हनुमानाचा आवडता मूलांक कोणता?
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 आहे. आज मोठा मंगळ आहे. या दिवशी जर वरील दिलेल्या जन्मतारखेच्या लोकांनी हनुमानाची पूजा केली तर तुम्हाला शुभ फळ मिळेल. मूलांक 9 हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळाचा संबंध हनुमानजीशी आहे. मंगळ हा उत्साह आणि उर्जेचा कारक आहे. त्यामुळे मूलांक 9 असलेले लोकांची निर्णयक्षमता चांगली असते.
9 मूलांकाच्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
- मूलांक क्रमांक 9 चे लोक हे स्वभावाने प्रचंड जिद्दी असतात. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यास ते सक्षम असतात. तसेच, जो काही निर्णय ते घेतात त्यावर ते ठाम असतात.
- मंगळ हा ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. त्यामुळे ज्या लोकांची रास मेष किंवा वृश्चिक आहे अशा लोकांवर नेहमीच भगवान हनुमानाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो.
- तसेच, ज्या लोकांचा मूलांक 9 आहे असे लोक कोणतेही काम करताना किंवा कोणताही निर्णय घेताना घाबरत नाहीत. तर, एकदा घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात. यामुळेच, हे लोक प्रत्येक कामात पुढे राहतात, प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना करतात. या जन्मतारखेचे लोक खूप धाडसी आणि वेगवान असतात.
- मूलांक 9 शक्तीचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक शक्तिशाली असतात आणि शरीराच्या दृष्टीने खूप शक्तिशाली असतात. कोणत्याही कठीण परिस्थितीत हे लोक सहजासहजी हार मानत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Budhwa Mangal 2024 : आज 'मोठा मंगळ'सह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर असणार हनुमानाची विशेष कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)