Numerology : शनीदेवाची कृपा! वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; जगतात ऐटीत आणि राजेशाही थाटात
Numerology Of Mulank 8 : मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.

Numerology Of Mulank 8 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani dev) कर्मफळदाता म्हणतात. शनी प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. राशींप्रमाणेच अंकशास्त्रात देखील मूलांकावरुन (Mulank) व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी कळतात. यासाठी आज आपण मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात की, या मूलांकाच्या लोकांवर शनीदेवाची विशेष कृपा असते. या जन्मतारखेच्या लोकांचा सुरुवातीलाच काळ फार संघर्षाचा असतो. मात्र, नंतर हे लोक राजेशाही थाटात जगतात. हा मूलांक नेमका कोणता त्याविषयी जाणून घेऊयात.
राजासारखं जीवन जगतात
आज आपण मूलांक 8 च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. या मूलांकाचा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचं आध्यात्मिक तसेच, धार्मिक कार्यात मन रमतं. मात्र, त्यांना फार उशीराने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं. याच कारणामुळे अनेकदा हे लोक हिंमत हरतात.
शनीची असते कृपा
मूलांक 8 असणारे लोक शनीदेवाला प्रचंड प्रिय असतात. असं म्हणतात की, या जन्मतारखेचे लोक जर योग्य दिशेने मेहनत करतील तर एका ठराविक काळानंतर श्रीमंत होऊ शकतात. या जन्मतारखेच्या लोकांकडे सुख-सुविधांची कमी नसते.
हळुहळू मिळतं यश
ज्याप्रमाणे शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्याचप्रमाणे या जन्मतारखेच्या लोकांनाही हळुहळू यश मिळतं. त्यामुळेच यांना धैर्य ठेवण्यास सांगितलं जातं.
वयाच्या 'या' टप्प्यात मिळते श्रीमंती
या जन्मतारखेच्या लोकांबद्दल असं म्हणतात की, या लोकांना वयाच्या तिशी, चाळीशीनंतर यश मिळतं. मात्र, त्याआधी त्यांना फार मेहनत घ्यावी लागते. मात्र, जसे ते वयाच्या तिशीत येतात त्यांच्या सर्व मेहनतीचं फळ त्यांना मिळतं. कालांतराने या जन्मतारखेचे लोक श्रीमंत होतात. याचं कारण म्हणजे यांच्यावर शनी महाराजांचा प्रभाव असतो.
'या' गुणामुळे होतात यशस्वी
या जन्मतारखेचे लोक फार धैर्यवान असतात. याच गुणामुळे यांना आयुष्यात फार यश मिळतं. हे लोक पटकन हार मानत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















