Guru Gochar 2025 : गुरु ग्रहाच्या संक्रमणाने उजळणार 3 राशींचं भाग्य; 9 जुलैपासून सुरु होणार सुवर्णकाळ, मोठ्ठी संधी चालून येणार
Guru Gochar 2025 : गुरुच्या राशीत आल्याने कर्क राशीच्या सुखात चांगली भरभराट होईल. गुरुच्या संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांना अत्यंत शुभ परिणाम मिळतील.

Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाला धर्म, ज्ञान, धन-संपत्ती आणि नशिबाचा कारक ग्रह मानला जातो. गुरु ग्रह (Guru Gochar) कोणत्याही राशीत तब्बल 13 महिन्यांपर्यंत स्थित राहतात. सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान आहे. गुरु ग्रहाच्या अतिचारी चालीने 19 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे.
गुरुच्या राशीत आल्याने कर्क राशीच्या सुखात चांगली भरभराट होईल. गुरुच्या संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांना अत्यंत शुभ परिणाम मिळतील. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाच्या संक्रमणाने तीन राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
गुरु ग्रहाचं कर्क राशीत होणारं संक्रमण मेष राशीसाठी भाग्याचं ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी सिनिअर्सचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला असेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल.
सिंह रास (Leo Horoscope)
गुरुच्या संक्रमणाने सिंह राशीसाठी देखील हा काळ चांगला असेल. या काळात तुम्ही ज्या योजना आखाल त्या पूर्ण होतील. राशीवर गुरु ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. तसेच, व्यावसायिक समस्या दूर होतील. पार्टनरबरोबर तुम्ही चांगला क्वालिटी टाईम घालवाल. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
गुरुच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी ही वेळ चांगली असेल. तुमचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचाल. तसेच, तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ होईल. या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. नवीन गोष्टी शिका. तसेच, बुद्धीला चालना द्या. तुमचा चांगला विकास होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















