Navratri Puja : नवरात्रीमध्ये देवी होईल प्रसन्न! 9 दिवसांत काय करावे? काय करू नये? जाणून घ्या
Navratri Puja : नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
Navratri Puja : शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2022) महाउत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात या सणाला देवीच्या पूजेला (Navratri puja 2022) विशेष महत्त्व आहे. यामध्ये कलश (Kalash Pooja) बसवल्यानंतर भाविक मातेची विधिवत पूजा करतात. नवरात्रीच्या मुहूर्तावर घराघरांमध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण असते. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या भक्तांसाठी खूप महत्वाचे आहेत.
कधीपासून सुरू होते नवरात्र?
यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल आणि नवमी तिथी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरी केली जाईल. त्यामुळे मातेच्या पूजेमध्ये काही नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या नियमांची काळजी घेतल्यास आपली साधना लवकर पूर्ण होईल आणि आपल्या सर्वांवर आई जगदंबेच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. देवीला लाल रंग खूप प्रिय आहे, म्हणून या 9 दिवसात मातेच्या पूजेमध्ये लाल फुले अर्पण करा, तसेच मातेला लाल साडी किंवा लाल वस्त्र घाला.
जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 दिवसांत काय करावे? ज्यामुळे देवी होईल प्रसन्न
-नवरात्रीत मातेची पूजा मांडाल, तेव्हा लाल कपडा पसरवावा. कारण ते समृद्धीचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले, त्यामुळे आपली काम करण्याची क्षमताही वाढते.
-नवरात्रीमध्ये तुम्ही आईचा श्रृंगारही करू शकता, तो मातेला खूप प्रिय असतो. शक्य असल्यास लाल वस्त्र परिधान करा आणि मनापासून पूजा करा.
-रोज घराच्या मुख्य दारात पूजेपूर्वी रांगोळीने स्वस्तिक बनवा. स्वस्तिक बनवल्याने शुक्र आणि सूर्य हे ग्रह जीवनात सकारात्मकता आणतात.
-नवरात्रीच्या काळात तुम्ही नऊ दिवस मातेसमोर अखंड ज्योतीही पेटवू शकता. अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे व्रत घेतले असेल तर ती ज्योत नऊ दिवस तेवत राहावी, हे लक्षात ठेवावे.
-मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजेनंतर दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करता येते. जर दुर्गा सप्तशती पठण करता येत नसेल तर 'ओम ह्रीं क्लीं चामुंडयै विच्चे' हा जप रोज करावा.
नवरात्रीत काय करणे टाळावे?
-नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या दरम्यान मांस-दारू, लसूण-कांद्याचा वापर करू नये.
-नवरात्रीचा उपवास ठेवला तर तो संपूर्ण निष्ठेने करावा.
-जर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशची स्थापना केली असेल किंवा अखंड ज्योती लावत असाल तर या दिवसात घर रिकामे ठेवू नका.
-विष्णु पुराणानुसार, नवरात्रीत दिवसा झोपणे वर्ज्य मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीला बनताय अद्भुत योग, 'या' दिवशी होणार कलशाची स्थापना
- Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा