Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा
Navratri 2022 : तळलेले किंवा तेलकट पदार्थ उपवास करताना खाल्यानं काही लोकांना अॅसिडीचा त्रास देखील होतो. नवरात्रीमध्ये उपवास करताना जर अशक्तपणा जाणवत असेल तर या टीप्स फॉलो करा.
Navratri 2022 : लवकरच नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे देखील महत्व असते. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. काही लोक नऊ दिवस उपवास करतात. उपवास करत असताना अनेक वेळा अशक्तपणा जाणवतो. तळलेले किंवा तेलकट पदार्थ उपवास करताना खाल्यानं काही लोकांना अॅसिडीचा त्रास देखील होतो. उपवास करताना आरोग्याची कशी काळजी घ्यायची? तसेच उपवास करताना कोणत्या पदार्थांचा समावेश डाएटमध्ये करावा? असे प्रश्न अनेकांना पडत असतील. जाणून घेऊयात त्याबद्दल...
'या' फळांचा करा डाएटमध्ये समावेश
पपई : नवरात्रोत्सवात उपवास करताना पपई या फळाचा डाएटमध्ये समावेश करावा. पपईमुळे फूड पॉयजनिंग होत नाही. तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थकवा जाणवत नाही.
संत्री: जर तुम्हाला पपई आवडतं नसेल तर तुम्ही उपवास करताना संत्रीचं सेवन करु शकता. संत्री खाल्यानं बराच वेळ भूक लागत नाही. तसेच संत्रीचा आहारात समावेश केल्यानं इम्युनिटी देखील वाढते.
दूध प्या
उपवास करताना सारखा थकवा जाणवत असेल तर तुम्ही दूधाचे सेवन करु शकता. दूधामध्ये प्रोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 असते. त्यामुळे उपवास करताना दिवसातून दोन वेळा तरी दूध प्यावे. दुधामुळे अॅसिडिटी, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता या समस्या जाणवत नाहीत.
उपवास करत असताना त्वचेवरील ग्लो निघून जातो आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या. पाणी भरपूर प्यायल्यानं तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही. टोमॅटो आणि बटाट्याचा समावेश आहारात करा. टोमॅटो खाल्यानं भूक कंट्रोलमध्ये राहते. तसेच बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन असतात त्यामुळे बटाट्याचं सेवन केल्यानं अशक्तपणा जाणवत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :