ज्येष्ठा गौरी विसर्जन करण्याचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या काय सांगतात दाते गुरूजी
ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. यंदा गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे. जाणून घेऊया ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे.
मुंबई : तीन दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरी उत्सवात गौरींच विसर्जन (Gauri Visarjan) केले जाणार आहे. राज्यभरात यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला. मंगळवरी पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी गौरी पूजनानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. पुजेत ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैव्यद्य दाखवण्यात आला. त्यानंतर गुरुवारी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे. जाणून घेऊया ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि विधी. ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त तीन दिवसांच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींची विधीपूर्वक विसर्जन केले जाते. यंदा गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन केले जाणार आहे. जाणून घेऊया ज्येष्ठा गौरींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याबाबत सोलापूर येथील दाते पंचांगाचे सर्वेसर्वा मोहन दाते यांनी माहिती दिली आहे.
घरोघरी गौराईंचे उत्साहात स्वागत करण्यात आले. माहेरवाशीण गौराईचं रविवारी आवाहन झालं. त्यानंतर आज गौरी-गणपतीचं विसर्जन होणार आहे. जड अंत:करणानं गणेशभक्त लाडक्य बाप्पासह गौरीईला निरोप देतील. गौरी-गणपतीच्या आगमनासाठी भाविक अगदी महिनाभर आधीपासून तयारी सुरु करतात. सजावटीसाठी गणेशभक्त खूप मेहनत घेतात. त्यानंतर जेव्हा लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. तेव्हा मात्र प्रत्येक गणेशभक्ताचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी 12 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला जातो. त्याआधीत घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात. त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे.
गौरी विसर्जनाचा मुहूर्त
गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झालं.मंगळवारी गौरी आवाहन पार पडलं. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जन गुरुवारी संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे. 12 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री 10 पर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करु शकतो.यादरम्यान भक्तगण आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकतात, असे दाते पंचांगाचे सर्वेसर्वा मोहन दाते म्हणाले.