Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 'या' चुका टाळा; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी
Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
Janmashtami 2024 : जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (Janmashtami 2024) साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात या संदर्भात अनेकांचा संभ्रम असतो. हाच या निमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न करुयात.
'या' चुका अवश्य टाळा
1. तुळशीला स्पर्श करू नका - जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका. देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.
2. मोकळे केस सोडू नका - तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्या देवी-दैवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका. तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा.
3. तुळशीची पाने ओरबाडून तोडू नका - भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत. सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा. यानंतर त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्यावीत.
4. परिक्रमा - तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका. तुळशीपूजेनंतर किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा.
5. तुळशीचे वस्त्र बदला - काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत, तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत. तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो.
जन्माष्टमी 2024 कधी आहे? (Janmashtami 2024 Date)
यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे. 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल.
जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)
कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :