Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी जुळून येणार 'गजकेसरी राजयोग'; 'या' 3 राशींवर असणार भगवान श्रीकृष्णाची कृपा, प्रगतीसह मिळणार अपार धनलाभ
Janmashtami 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी दुर्लभ योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर शुक्रादित्य योग, शश राजयोग आणि गजकेसरी योग देखील जुळून येणार आहे.
Janmashtami 2024 : 26 ऑगस्ट रोजी जगभरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या जन्माष्टमीला (Janmashtami 2024) फार महत्त्व आहे. कारण या दिवशी दुर्लभ योग (Yog) जुळून येणार आहे. तसेच, आजच्या दिवशी रोहिणी नक्षत्रासह सूर्य सिंह राशीत, चंद्र वृषभ राशीत तसेच जयंती योग जुळून येणार आहे. हा दुर्लभ संयोग फार शुभ मानला जातो. तसेच, या योगात पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी दुर्लभ योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर शुक्रादित्य योग, शश राजयोग आणि गजकेसरी योग देखील जुळून येणार आहे. त्यामुळे गजकेसरी योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. या दिवशी भगवान विष्णूची कोणकोणत्या राशींवर (Zodiac Signs) कृपा असेल ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे. या दिवशी गजकेसरी योग निर्माण झाल्यामुळे अनेक शुभ परिणाम या राशीच्या लोकांना मिळणार आहेत. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, तुम्ही कर्जातून देखील मुक्त व्हाल. जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवस फार खास असणार आहे. या राशीच्या लोकांवर शुक्रासह अन्य ग्रहांची देखील दृष्टी पडणार आहे. त्यामुळे तुमच्या बुद्धी कौशल्याचा चांगला विकास होईल. तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सहयोग मिळेल. धनलाभाचे देखील चांगले योग जुळून येणार आहे. आरोग्यात देखील सुधारणा होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा चांगला लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांचा अध्यात्माच्या दृष्टीने चांगला विकास होईल. तुमच्या कुटुंबात लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा दिवस चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :