Janmashtami 2022 : जन्माष्टमीच्या दिवशी 'या' राशींना होणार फायदा
Janmashtami 2022 : भगवान श्रीकृष्णाची जयंती श्रीकृष्णजन्माष्टमी म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते.
Janmashtami 2022 : पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला मथुरेच्या तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्णाची जयंती श्रीकृष्णजन्माष्टमी म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते.
धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो आणि आपल्या आवडत्या वस्तू आपल्या घरात ठेवतो, अशा भक्तांच्या जीवनात कधीच अडचणी येत नाहीत. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. नोकरी, व्यवसाय इत्यादी सर्वच क्षेत्रात यश मिळते. त्याचा आनंद आणि समृद्धी वाढते.
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी कृष्ण जन्माष्टमीचा दिवस खूप शुभ राहील. त्यांच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल.
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नका. कोणाला वाईट बोलू नका.
जन्माष्टमीला काळ्या रंगाचे कपडे घालू नका.
जर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाच्या पूजेमध्ये लाडू अर्पण करत असाल तर त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर करा.
रात्री बारा वाजेपर्यंत व्रत पाळताना उपवास करणाऱ्यांनी अन्न खाऊ नये.
जन्माष्टमीला गायीची पूजा आणि सेवा अवश्य करावी.
मिथुन : या राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवस शुभ राहील . भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने त्यांचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम सुरू होईल. मन शांत राहील. सर्व कामात यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या : या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे . अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल. ज्याचा खूप उपयोग होईल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात सुधारणा होईल. मित्रांसोबत पार्टी करू शकता. आर्थिक क्षेत्र मजबूत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :