Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य
Horoscope Today 29th March 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 29th March 2023 : आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. तुम्हाला मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत बळ येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे ओळखीच्या व्यक्तीने संपतील, त्यामुळे कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित होतील. प्रत्येकजण पुढे जाऊन काम करताना दिसेल. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत दिलेली कामे पूर्ण प्रामाणिकपणे करावी लागतील. अधिकार्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. जे तुमच्या व्यवसायाला खूप पुढे नेतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. रखडलेला पैसा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला भेटायला येतील, ज्यांना भेटून तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही मित्रांबरोबर सुख-दु:ख शेअर करु शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहिल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना उद्या आणखी काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बदलीची संधी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. वडिलोपार्जित व्यवसायात तुम्ही काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय पुढे नेता येईल. मेहनत जास्त असेल, पण यश मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. आधीच अस्तित्वात असलेली आरोग्य स्थिती तुम्हाला त्रास देऊ शकते. तुम्ही वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे घरातून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार आपल्या नोकरीत प्रगती झाल्यानंतर खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंद होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जी कामे पैशांमुळे थांबली होती, ती कामेही पूर्ण होतील. शैक्षणिक कामात लक्ष द्या. एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीबद्दल तुम्हाला थोडी चिंता भासू शकते. आरोग्याबाबत जागरुक राहा. संयम राखण्याचा प्रयत्न करा. राजकारणात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठीही काळ चांगला आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत, त्यांना त्यांच्या मित्रांच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि काहीतरी नवं शिका जे तुमच्या भविष्यात उपयोगी पडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधीही मिळतील. संध्याकाळी पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहिल. तब्येत हळूहळू सुधारेल. मोठ्या सदस्यांकडून धनलाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक आनंदी दिसतील. आईचा सहवास मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काही काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक कराल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. विवाहित लोक आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाने आणि शांततेने जगतील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कुटुंबाकडून अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. कुटुंबाच्या भल्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे काही लोक नाराज दिसतील. भावाच्या लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील. घरोघरी शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, परंतु जुन्या नोकरीत राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर भागीदारी करून नवीन व्यवसायाची योजना आखू शकता. तुमच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल. फक्त नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आज कोणासाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी येणारा काळ चांगला असणार आहे.
कुंभ
आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आज आपल्या व्यवसायात यश मिळेल. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन वाहन खरेदी करण्याचा चांगला योग आहे. जमिनीत देखील तुम्ही आज गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला अधिकार्यांचे सहकार्य मिळेल, त्यांच्याकडून शुभवार्ता मिळतील.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या तब्येतीत पूर्वीपेक्षा सुधारणा दिसेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. घर, दुकान, फ्लॅट खरेदी करण्याचा तुमचा जर विचार असेल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचा पैसा जर कुठे अडकला असेल तर तो तुम्हाला परत मिळू शकतो. आज तुमची जु्या मित्रांशी भेट होऊ शकते त्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर संध्याकाळचा वेळ घालवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today : वृषभ, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य