एक्स्प्लोर

Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 22 June 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना नोकरीत अधिका-यांची साथ मिळेल, पण बदली होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जे लोक कामाच्या शोधात भटकत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमच्या एखाद्या नातेवाईकामुळे तुम्हाला उत्पन्नाच्या काही संधीही मिळतील. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल. जे घरापासून दूर काम करतायत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. आज आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा, अन्यथा आरोग्यावर परिणाम होईल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज फायदा होईल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. नोकरदार लोक नोकरीबरोबर काही व्यवसाय करण्याची योजना आखतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आज वरिष्ठ सदस्यांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधीही मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे लोकांना तुमचं कौतुक वाटेल. आज कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे.  

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही योग, ध्यान आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करू शकता. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बदलत्या हवामानामुळे मुलांच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. घरात पूजा आणि पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु राहील. आज व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर घालवा. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरदार वर्गाला नोकरीत केलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, परंतु सध्या तुमच्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले होईल. आज तुम्ही तुमच्या गोड बोलण्याच्या स्वभावाने तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काही नवीन काम सुरू करेल, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. आज अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. छोटे व्यापारी त्यांच्या व्यवसायात देखील नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या मालमत्तेतून चांगला नफा मिळेल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरात सुरू असलेली कायदेशीर कामे संपतील आणि सुख-शांती राहील. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य ठीक राहील, पण पोटाच्या आजारामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे घरापासून दूर काम करतायत, त्यांना कुटुंबाची उणीव भासेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर गुंतवणूक आधी केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी असणार आहे. जे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. उद्या तुमच्या ओळखीच्या कोणाच्याही मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. दूरच्या नातेवाईकांच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचाही फायदा मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज ते परत करा. तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे लोक ऑनलाइन काम करतायत त्यांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज आईच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगला रोजगार मिळेल. आईच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या वादात अडकणे टाळा, अन्यथा तुम्ही काही अडचणीत अडकू शकता. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमची प्रगती होईल. व्यवसायातील समस्या दूर होतील. नवीन योजना फलदायी ठरतील. नोकरीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. ज्येष्ठ सदस्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जे युवक घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. राजकारण्यांसाठी चांगला काळ आहे. तुमचे अनेक दिवसांपासून चाललेले कायदेशीर अडथळे आज दूर होतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जे कामाच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होईल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला सर्व क्षेत्रांतून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काढा. आज तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. वडिलांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची अनेक दिवसांपासूनची एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यवसायाची स्थिती चांगली राहील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी उच्च अधिकार्‍यांकडून मिळतील. व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही फायदा मिळेल. तुमचे थांबलेले पैसे परत मिळतील. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज सासरच्या मंडळींकडूनही काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला डोकेदुखी आणि डोळ्यांच्या दुखण्याने त्रास होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
Dhurandhar Box Office Collection Day 12: 'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
Embed widget