एक्स्प्लोर

Horoscope Today 21 June 2023 : मेष, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तर तूळ राशीला  जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एकूणच आजचा बुधवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात मदत करताना दिसेल. घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांना आज आपल्या  कुटुंबाची आठवण येईल. आज तुमची नोकरीत कामगिरी चांगली राहील. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल, पण बदली होण्याचीही शक्यता आहे. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. तुमचे एखादे काम थांबले असेल तर ते आज शेजाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होईल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक कामाच्या शोधात फिरत आहेत, त्यांना मित्राच्या मदतीने रोजगार मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी काळ चांगला आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आज तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. पैशांचा जपून वापर करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल. आज तुमची जवळच्या मित्राशी भेट होईल. यामुळे तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने, उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील उपलब्ध होतील, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते आज परत करा. तुमच्या मनातील काही गोष्टी आज पालकांबरोबर शेअर करा. तुमचं मन हलकं होईल. आज सासरच्या मंडळींकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या लोकांना अपेक्षित नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज राजकारणात चांगला दिवस आहे. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात बदलासाठी वरिष्ठांशी बोलतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर वेळ चांगला आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. आर्थिक सुखात वाढ होईल. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात धनप्राप्ती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान राहील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतायत ते व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. नवीन लोकांच्या संपर्कामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जोडीदाराच्या कामातील यशामुळे आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरोघरी पूजा, पाठ,पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. बँकिंग क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज शेजाऱ्यांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधीही उपलब्ध होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, जेणेकरून तुमचे मन आवडत्या गोष्टीत रमेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळतील. व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीचीही शक्यता निर्माण झाली आहे.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काही काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक कराल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याचा विचारही कराल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, तिथे थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणासाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भरपूर नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यालाही पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता दिसणार नाही. आज ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचेही पूर्ण सहकार्य मिळेल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर पालकांना खूप आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे मित्र खूप खूश होतील. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Vastu Tips : घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Vish Yog 2026 : शनि-चंद्राच्या युतीमुळे जुळून आला विष योग; 'या' 4 राशींच्या अडचणीत होणार वाढ, तुमची रास तर यात नाही?
शनि-चंद्राच्या युतीमुळे जुळून आला विष योग; 'या' 4 राशींच्या अडचणीत होणार वाढ, तुमची रास तर यात नाही?
Hindu Religion: कुलदेवता, गोत्र आणि कुळ यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय? धार्मिक मान्यता, परंपरेमागील महत्त्व जाणून घ्या
कुलदेवता, गोत्र आणि कुळ यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय? धार्मिक मान्यता, परंपरेमागील महत्त्व जाणून घ्या

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
Embed widget