एक्स्प्लोर

Horoscope Today 19 June 2023 : मेष, सिंह, मीनसह 'या' राशींना मिळणार यशाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 19 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 June 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार आज मीन राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. छोट्या व्यावसायिकांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांना काही विषयांमधली त्यांची आवड लक्षात येईल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात गोडवा राहील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज नोकरीत उत्साह राहील. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात नवीन कामे सुरू होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक सुधारणा होईल. आज तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू शकता. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. जुन्या मित्राच्या माध्यमातून तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधी मिळतील. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी काही महत्त्वाच्या कामासाठी बोलाल यावेळी बोलण्यात गोडवा ठेवा. कामाच्या ठिकाणी बोलण्यात काळजी घ्या. राजकारणात प्रगती आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. आज तुमचा जुना मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येईल, ज्याने सर्वांना खूप आनंद होईल. मित्रासोबत थोडा वेळ घालवा. व्यवसाय करणारे लोक रखडलेली व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याची शक्यता देखील आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर असेल.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला व्यवसायात चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही अनेकांची मनं जिंकाल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. घरातून बाहेर पडताना सदस्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला तर तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज तुमची तब्येत ठीक राहील, पण खाण्याकडे लक्ष द्या. आज सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायात तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकाल. तुमच्या कामात तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील, पण जास्त तळलेले, भाजलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. घरामध्ये हवन, पूजा, पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरू होईल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमचे मन आवडत्या गोष्टीत रमवा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधीही उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत कराल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करा. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. नोकरदारांना प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्यही मिळेल. कुटुंबाच्या भल्यासाठी जोडीदाराबरोबर काम करताना दिसाल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केलेत तर ते अधिक चांगले होईल. आज कुटुंबात दूरच्या नातेवाईकाच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. आज व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा आणि जास्त खर्च करू नका. आजची गुंतवणूक घातक ठरू शकते. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्हाला वरिष्ठ सदस्याकडून पैसे कसे वाचवायचे हे शिकायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. नोकरी सोबत काही साईड वर्क करण्याची योजना करा, जेणेकरून तुमचे उत्पन्न वाढू शकेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कामात मदत कराल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. आज तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. छोटे व्यावसायिक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे मूळ व्यवसायात काही बदल करतील. ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा आणि सहवास मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुमची रखडलेली कामे उद्या पूर्ण करा. आज तुमचे कुटुंबीय सर्वजण धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग, ध्यान यांचा समावेश करा. तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे . व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे थांबलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. घरापासून दूर काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आज खूप फायदा होईल. जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर नक्कीच कोणाचा तरी सल्ला घ्या. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. उद्या दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत लाभ होईल. अधिकार्‍यांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात प्रगती होईल. पैशाशी संबंधित योजनांवर विचार करा. कुटुंबात शांतता राहील. आज सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget