एक्स्प्लोर

Horoscope Today 18 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 18 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 June 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीचे लोक आपली सर्व रखडलेली कामे आज पूर्ण करू शकतील. मीन राशीच्या लोकांना मित्रांच्या मदतीने काही नवीन काम करायला मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढू शकेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. आज तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा. यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल त्यात तुम्हाला यश मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रेम आणि व्यवसायाची स्थिती खूप चांगली आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचेही सहकार्य मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आज तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेतली जाईल. पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असाल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस आनंददायी असेल. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, ज्यातून तुम्हाला फायदा मिळू शकेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे तरूण नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात भरपूर नफा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आरोग्य आणि व्यवसायाची स्थिती खूप चांगली आहे. आज वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. आज कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्येष्ठ सदस्यांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्ही केलेल्या कार्यामुळे वरिष्ठ अधिकारी खूश होतील. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर थोडा विलंब होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. कलात्मक आणि सर्जनशील क्षेत्रात वाढ होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायात तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकाल. तुमच्या कामात तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुमचे दैनंदिन उत्पन्न चांगले असेल पण खर्चही जास्त होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत करा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. बहिणीच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर असेल. आज तुमचे रखडलेले कामही पूर्ण होईल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मित्रांच्या मदतीने वाहनाचा आनंदही मिळेल. नातेवाईकाच्या मदतीने रखडलेले पैसे मिळवण्यात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते वेळेवर परत करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. .

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमचे अनेक दिवसांपासून थांबलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यक्रमात आईबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जातील, जिथे सर्वजण आनंदी दिसतील. दूरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावा-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. घरबसल्या ऑनलाईन काम करणा-या लोकांना फायदा होईल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. प्रत्येकजण आपापले सुख-दु:ख एकत्र शेअर करताना दिसतील. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पैसे कसे वाचवायचे हे आज वरिष्ठ सदस्यांकडून शिकून घ्या. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमचे काम पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आज शेजाऱ्यांच्या वादात पडणे टाळा. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळेल. तुमच्या व्यवसायातील समस्या तुमच्या जवळच्या मित्राबरोबर शेअर करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल.    

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याचीही शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान, नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. बेरोजगारांनाही चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील. या निमित्ताने पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. जास्त खर्च केल्याने आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु उच्च अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणाशीही बोलू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना कोणताही करार अतिशय काळजीपूर्वक करावा लागेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणाचा तरी सल्ला नक्की घ्या. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधीही मिळतील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. मुलांना चांगली नोकरी मिळाल्यास पालकांना खूप आनंद होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांच्या मदतीने तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. फक्त बाहेरचं अन्न खाणं टाळा. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही मुलांसोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget