एक्स्प्लोर

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 April 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 April 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक आपल्या कुटुंबीयांसह धार्मिक स्थळांना भेट देतील, त्यांना मानसिक शांती मिळेल. कन्या आणि वृश्चिक राशीला राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. मेष ते मीन राशीसाठी गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. फक्त तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दीर्घकाळ कामाचा दबाव तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणीआपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ओळखीच्या व्यक्तींशी बोलताना दिसतील. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी करत आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठही तुमच्या कामात मदत करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्व लोकांना तुमचे काम करून देऊ शकाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ज्यांनी भूतकाळात आपले पैसे गुंतवले होते, त्यांना आज त्या पैशांतून फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या रुटीनमधून ब्रेक घ्यावा लागेल आणि स्वत:साठी वेळ द्या.  

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. जास्त मानसिक ताण तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. जरी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु सतत पैशांचा प्रवाह तुमच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. तुमचा आनंद तुमच्या पालकांसोबत शेअर करा. एखादा जुना मित्र तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आठवणी ताज्या करू शकतो. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजयी होतील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही योगासने, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकता, ज्यामुळे तुम्ही नेहमी ताजेतवाने आणि प्रसन्न राहाल.  तुमच्या प्रेम जीवनात गोडवा असेल. चांगले क्षण तुम्ही तुमच्या प्रियकराबरोबर घालवाल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या मनाला शांती मिळेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची चांगली संधी आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मात्र अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळाल्यानंतर खूप आनंदी होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता जिथे तुमच्या मनाला शांती मिळेल. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम अनेक प्रकारे दिसून येईल. तुमच्या मुलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या कारण तुम्ही असे न केल्यास त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या आरोग्यावर खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ तुम्हाला मदत करतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. संध्याकाळची वेळ मित्रांबरोबर चांगली जाईल, पण अशा वेळी तुमच्या आहाराची देखील काळजी घ्या. तुमच्या जवळचे लोक तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकतात. प्रेम जीवनात चढ-उतार येतील. वेळेचा सदुपयोग करायला शिका. आपल्याकडे मोकळा वेळ असल्यास, काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. वेळ वाया घालवू नका. आज तुमचे दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, ज्यांना भेटून तुम्ही खूप आनंदी व्हाल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व काही ठीक आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमचे कायदेशीर काम जे चालू होते ते आज संपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. सध्या तुम्ही तुमच्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्राच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत कराल. धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला मित्रांद्वारे नवीन संपर्क देखील मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांना भविष्यात चांगली संधी आहे. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आज कोणाच्याही सल्ल्यानुसार गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होईल. आज तुमच्या कोणत्याही कामात तुम्हाला जोडीदाराचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जर काही दिवसांपासून तुमची चिडचिड होत असेल तर तुमच्या योग्य कृती आणि विचारांवर लक्ष केंद्रित करा. तुमची आर्थिक स्थिती देखील लवकरच सुधारेल. तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील, प्रत्येकजण आपले सुख-दु:ख वाटून घेतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. घरातील वरिष्ठ सदस्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. जे अविवाहित लोक आहेत त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. संध्याकाळचा वेळ तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी घालवल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न होईल. जवळच्या मित्राच्या मदतीने उद्या काही व्यावसायिकांना खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे, यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. गरजेच्या वेळी मित्रांची साथ मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, जे आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला आज परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर बसून आयुष्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा टिकवून ठेवावा लागेल. अन्यथा तुमच्या बोलण्याने घरातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यस्त दिवसातून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून काम करून घेऊ शकाल. नोकरदार वर्गासाठी मात्र, आजचा दिवस फारचा चांगला नाही. कारण आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, दुकान, फ्लॅट घेण्याचा जर तुमचा विचार असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. विद्यार्थ्यांना परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आज संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यक्रमांसाठी द्या. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यात त्यांना यश मिळेल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. बिझनेस करणाऱ्या लोकांच्या व्यवसायात कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे ते खूप व्यस्त राहतील आणि कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झालेली दिसेल. आज तुम्हाला दूरच्या एका नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांशी चांगले वागा. आज तुमची आर्थिक स्थिती काहीशी बिघडू शकते. जास्त खर्च करावा लागू शकतो. जी माणसं तुमच्या विश्वासातली नाहीत अशा व्यक्तींबरोबर पैशांचे व्यवहार करू नका, गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget