एक्स्प्लोर

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 05 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 05 June 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या घरात सुख-शांती राहील. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज घरापासून दूर गेलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. आज काहीतरी नवीन शिकण्याची तुमची इच्छा होईल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. आज धनलाभ मिळण्याचे संकेत आहेत. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तुमच्या प्रेम जीवनात खूप आनंद दिसेल. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रियकरासह प्रेमळ क्षण घालवतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही ओळख करून देतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा योग आहे. जे इतरांच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करू शकता. आज घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या मुलांकडून मिळालेल्या सन्मानाने तुम्ही खूप आनंदी दिसाल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात काही नवीन योजना सुरू करतील, ज्यामुळे ते व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरामध्ये शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. विनाकारण स्वतःवर टीका करू नका. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल म्हणून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे सोपे जाईल. मित्राच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा सहज पूर्ण होऊ शकते. तुमची रखडलेली कामेही वेळेवर पूर्ण करू शकाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. नोकरदार वर्गाला नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही अनेकांचा विश्वास संपादन करू शकाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जातील, हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्यास तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करा. तुम्ही भविष्यात पैसे कसे वाचवले पाहिजेत याविषयी घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन देण्यात येईल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतायत, त्यांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. कुटुंबीयांसह धार्मिक कार्यक्रमातही सहभागी व्हा.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचे मित्रही तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. आज तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने नवीन संपर्क मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, फ्लॅट घेण्याचा तुमचा जो विचार होता तो पूर्ण होताना दिसेल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. सामाजिक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला कोणत्याही नवीन व्यवसायात पूर्ण मदत करतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, त्यांनाही भरपूर नफा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ सदस्य खूप खूश होतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. तुमचे छंद जोपासा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी असणार आहे. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद राहील, परंतु नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल परंतु सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नोकरीतही तुमच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. पैसे येण्याचीही चिन्हे आहेत. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या वादात अडकणे टाळा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उद्या तुम्ही तुमची रखडलेली कामे मित्राच्या मदतीने पूर्ण करू शकाल. घरी पूजा, पाठ, पठण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमातही घालवा. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. नोकरदारांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्हाला काही अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आज खूप फायदा होईल. राजकारणात यशाचे संकेत आहेत. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे मजा करा. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. 
 
मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला उद्या परत मिळतील. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात भरपूर नफा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मुलाचे आरोग्य सुधारेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफीVarsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special ReportNarayangad VS Bhagwangad : बीड प्रकरणी गडाच्या परंपरेला वादाचं आख्यान? Rajkiya Sholay Special ReportRahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Embed widget