एक्स्प्लोर

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 June 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना धनलाभ होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशींसाठी कसा असे आजचा शनिवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यशाली तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाच्या शोधात जे तरूण फिरत आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे उच्च अधिकारी खूप खूश होतील. व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा. आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आज कोणतंही  काम करताना घराबाहेर पडण्याआधी घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या नवीन प्रकल्पांसाठी तुमच्या पालकांना विश्वासात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबीयांनासुद्धा वेळ द्या. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. अशा मित्रांपासून दूर राहा जे तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवतात. मित्रांच्या मदतीने आज काही नवीन काम करण्याची संधी मिळेल. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. घरगुती जीवनात सुख शांती राहील. सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज कामाच्या ठिकाणी तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण करा. वरिष्ठांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुम्ही थोडेसे बेचैन व्हाल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्ही कोणतेही काम करत असाल, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करत आहेत, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मेळाव्याला संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत, त्यांना त्यांच्या मित्रांच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि काहीतरी नवं शिका जे तुमच्या भविष्यात उपयोगी पडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधीही मिळतील. संध्याकाळी पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहिल. तब्येत हळूहळू सुधारेल. मोठ्या सदस्यांकडून धनलाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक आनंदी दिसतील. आईचा सहवास मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काही काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक कराल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याचा विचारही कराल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, तिथे थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणासाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भरपूर नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यालाही पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता दिसणार नाही. आज ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचेही पूर्ण सहकार्य मिळेल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर पालकांना खूप आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे मित्र खूप खूश होतील. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 03 June 2023 : मेष, तूळ, मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget