Hartalika Teej 2024 : हरितालिकेच्या दिवशी 'या' 5 गोष्टींचे करा दान; महादेव-माता पार्वतीची सदैव राहील कृपा
Hartalika Teej 2024 : हरितालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात.
Hartalika Teej 2024 : हिंदू पंचांगानुसार, 06 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या हरितालिकेची (Hartalika) व्रत असणार आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. या दिवशी महिलांनी 5 वस्तूंचे दान करणं शुभ मानलं जातं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
पूजेचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.
देवी पार्वतीने केलं होतं कठीण व्रत
हरितालिका साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरितालिकेचं व्रत केलं होतं. आणि त्यानुसार त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता. त्यानुसार, जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी सौभाग्यवती स्त्रिया तसेच, चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका या दिवशी व्रत करतात.
हरितालिकेची दिवशी 'या' वस्तूंचं दान करा
फळं - विवाहित महिलांसाठी हरितालिका तीज या व्रताचे खूप महत्त्व आहे. मंदिरात मधाच्या वस्तूंसोबत फळांचे दान केल्याने या दिवशी सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
गहू - गहू आणि जवाचे दान सोने दान करण्यासारखे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तीज व्रताच्या वेळी गहू दान केल्यास शुभ फळ मिळते. जर गहू नसेल तर तुम्ही गरजूंना पीठही दान करू शकता.
वस्त्र - हरितालिका व्रताच्या दिवशी कोणत्याही ब्राह्मण महिला किंवा गरीब लोकांना कपडे दान करा. असे मानले जाते की महादेव आणि देवी पार्वती प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचे वरदान देतात.
तांदूळ - तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते. हरितालिका तीजला तांदूळ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात असे म्हणतात. कुटुंबात सुख-शांती नांदते.
गूळ - हरितालिका तीजचे व्रत मंगळवारी पडत आहे. या दिवशी गुळाचे दान केल्यास चांगले फळ मिळते. गोरगरिबांना गुळाचे दान केल्याने महिलांना आरोग्य लाभ होतो असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :