एक्स्प्लोर

Hartalika 2024 : 5 की 6 सप्टेंबर? हरितालिका नेमकी कधी? कोणत्या वयोगटातील स्त्रियांनी करावं व्रत?

Hartalika Teej 2024 : हरितालिका व्रत हे सौभाग्य देणारं आहे. चांगला नवरा मिळावा, वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून हे व्रत केलं जातं. परंतु केवळ कुमारिका आणि विवाहितांनीच हे व्रत करावं असं नाही.

Hartalika Teej 2024 : स्त्रियांसाठी हरितालिकेच्या (Hartalika Teej 2024) व्रताचं मोठं महत्त्व आहे. पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत पाळलं जातं. हे व्रत सौभाग्य वाढवणारं मानलं जातं. हरितालिकेच्या दिवशी भगवान शंकराने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं, त्यामुळे महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. चांगला पती मिळावा यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत केलं जातं.

हरितालिकेतचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात. यंदा हरितालिका (Hartalika Teej 2024 Date) नेमकी कधी? जाणून घेऊया.

हरितालिका नेमकी कधी? (Hartalika Teej 2024 Date)

पंचांगानुसार, हरितालिका भाद्रपद शुक्ल तृतीया तिथील साजरी केली जाते. यावर्षी तृतीया तिथी 5 सप्टेंबरला दुपारी 12:21 वाजता सुरू होतेय आणि ती 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 पर्यंत आहे. उदयतिथीनुसार, हरितालिका 6 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे.

हरितालिका 2024 अशुभ वेळ (Hartalika Teej 2024 Ashubh Muhurta)

अशुभ वेळी हरितालिका पूजा करू नका. या दिवशी विशेषत: राहू काळात पूजा करू नये. त्या दिवशी राहुकाळ सकाळी 10:45 ते दुपारी 12:19 पर्यंत आहे.

कोणत्या स्त्रियांनी करावं हरितालिका व्रत? 

हरितालिका व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया, याच्यासोबत विधवा स्त्रियाही करतात. हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात. तर चांगला पती मिळावा, यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात. असं मानलं जातं की, शंकर-पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा, म्हणून या दिवशी उपवास करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करतात.

हरितालिका पूजा विधी (Hartalika Puja Vidhi)

हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी.  शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.

चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Bhadrapada Month 2024 : भाद्रपद महिना 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्जVasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलंMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget