Guru Margi 2022 : दिवाळीनंतर 'या' राशींवर राहिल गुरुची कृपा, सुख आणि समृद्धी मिळेल
Guru Margi 2022 : ग्रहांचे बदल किंवा त्यांच्या हालचालीतील बदलांचा परिणाम माणसांच्या जीवनावर होतो. प्रतिगामी गुरू दिवाळीनंतर मार्गस्थ होईल.
Guru Margi 2022 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला खूप महत्व आहे. ग्रहांचे बदल किंवा त्यांच्या हालचालीतील बदलांचा परिणाम माणसांच्या जीवनावर होतो. प्रतिगामी गुरू ( Jupiter Transit) दिवाळीनंतर मार्गस्थ होईल. 29 जुलै 2022 रोजी देवगुरुने गुरू मीन राशीत प्रवेश केला होता. त्यावेळी गुरू प्रतिगामी अवस्थेत संक्रमण करत होते. आता 26 ऑक्टोबरला मीन राशीत प्रतिगामी होईल. गुरू 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत या राशीत राहील. यामुळे या राशीच्य लोकांना विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
महाभारत (mahabharat) या धार्मिक ग्रंथानुसार देवगुरु बृहस्पती हे महर्षी अंगिराचे पुत्र आहेत. शास्त्रानुसार गुरू हा ब्रह्म ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. मान्यतेनुसार केळीच्या झाडाची गुरु मानून पूजा केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. देवगुरूचा रंग पिवळा आहे.
या राशींवर होणार प्रभाव (Guru Margi 2022)
वृषभ : देव गुरू मीन राशीत आल्यामुळे वृषभ राशीसाठी चांगला काळ येईल. वृषभ राशीच्या लोकांना उत्पन्नात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील आणि उत्पन्न वाढेल. वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल.
मिथुन : या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.ते प्रगती करू शकतात. व्यवसायात मोठे सौदे मिळू शकतात. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना गुरू मार्गात असल्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल . रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. जे लोक परदेशी व्यापारात गुंतलेले आहेत त्यांना अधिक नफा मिळेल. तसेच व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता.
कुंभ : तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायात नफा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
महत्वाच्या बातम्या