Akshaya Tritiya 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनतोय गजकेसरी योग; 'या' 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, होणार अचानक धनलाभ
Akshaya Tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग तयार होणार आहे, ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Akshaya Tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी होणार आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2024) गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग गुरू आणि चंद्र एकत्र आल्याने तयार होईल, या योगामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. आता या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी घरावर हा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तसेच, परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना यशाच्या अनेक अद्भुत संधी उपलब्ध होतील. या राशीच्या लोकांना चांगले पैसे मिळतील आणि या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, तुमच्या बोलण्यावर लोक प्रभावित होतील आणि तुमचा सर्कल वाढेल.
कर्क रास (Cancer)
गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे कर्क राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकतात, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या नवव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे तुमची प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुमची आर्थिक स्थितीही खूप चांगली असेल. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमचा देश-विदेशात प्रवास होऊ शकतो. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी देखील गजसेकरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीतून दहाव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते. तुम्ही करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल आणि अनेक अद्भूत संधी तुमच्या वाट्याला येतील. तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: