एक्स्प्लोर

Monthly Horoscope May 2024 : मे महिन्यात 'या' राशींना लागणार लॉटरी! करिअर, आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची, वाचा सर्व 12 राशींचे मासिक राशीभविष्य

May Monthly Horoscope 2024 : मे महिन्यात मोठ्या ग्रहांचं परिवर्तन होत आहे, त्यामुळे अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत. अशा स्थितीत काही राशींचं नशीब उजळू शकतं. तुमच्यासाठी मे महिना किती खास असेल? जाणून घ्या सर्व राशींचं मासिक राशीभविष्य

May Monthly Horoscope 2024 : मे 2024 महिना खूप खास असणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या तारखेलाच मोठ्या ग्रहाचं परिवर्तन झालं आहे. नऊ ग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह असलेल्या गुरुने (Jupiter Transit 2024) मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. मे महिन्यात अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होत आहेत. मे महिन्यात घडून येत असलेल्या अनेक शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. त्यानुसार, तुमच्यासाठी मे महिना किती खास असेल? सर्व 12 राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊया.

मेष (Aries Monthly Horoscope May 2024)

मे महिन्यात मेष राशीच्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल. या काळात कोणाशीही वाद घालणं टाळा. नोकरीत वाढ मंद राहील आणि तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायासाठी मात्र ही चांगली वेळ आहे, तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. प्रेमीयुगुलासाठी हा काळ आनंदाचा असेल. तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी टाकून फिरायला जाऊ शकता. तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे संबंध थोडे बिघडू शकतात.

वृषभ (Taurus Monthly Horoscope May 2024)

नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांचा तुम्हाला चांगला परतावा मिळेल, परंतु तुम्ही गर्विष्ठ स्वभाव दूर ठेवला पाहिजे. नोकरीतील जबाबदाऱ्या बदलल्यामुळे तुमच्यापैकी काहींची बदली होऊ शकते. व्यवसायात असलेल्यांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजे. आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. जोडपे एकमेकांना मदत करून आनंदी राहतील.

मिथुन (Gemini Monthly Horoscope May 2024)

नोकरीत प्रगती करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुमच्यापैकी काहींची उच्च पदावर बदली होऊ शकते. तुम्हाला बढती मिळेल. तुमच्या स्वभावामुळे सहकारी तुमची वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना परदेशी बाजाराचा फायदा होऊ शकतो. काही दिवस आर्थिक संकटाचाही सामना करावा लागेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. जुन्या कौटुंबिक अडचणी पुन्हा निर्माण होऊ शकतात.

कर्क (Cancer Monthly Horoscope May 2024)

तुमच्या कामात तुम्हाला काही चढ-उतार जाणवू शकतात. कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण असू शकतं, तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची इच्छा होणार नाही. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असेल, तुम्हाला लाभाच्या संधी प्राप्त होतील. दीर्घकालीन पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जोडीदारासोबत वैयक्तिक पातळीवर गैरसमज होऊ शकतात. कौटुंबिक वादावर त्वरित तोडगा काढावा.

सिंह (Leo Monthly Horoscope May 2024)

कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मालमत्तेशी संबंधित कोणताही खटला सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. गुंतवणुकीची घाई करू नका, शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक करा. नवीन व्यावसायिक धोरणं विकसित करण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरा. वाहन चालवणं टाळा, कारण तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. विश्वासाचा अभाव आणि इनसिक्योरिटीमुळे प्रेम आणि विवाह ठरणं कठीण होऊ शकतं.

कन्या (Virgo Monthly Horoscope May 2024)

तुमच्या कामात काही अडचणी येतील, ज्यावर तुम्हाला संयमाने मात करता येईल. नोकरीत तुमच्यावर वेगळी जबाबदारी दिली जाईल, जी तुम्ही चांगली पार पाडाल. व्यावसायिकांना चढ-उतारांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना होल्डवर ठेवाव्या लागतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील किरकोळ मतभेद मोठ्या भांडणात बदलू शकतात.

तूळ (Libra Monthly Horoscope May 2024)

तुम्ही कठोर परिश्रम आणि प्रयत्न केले तर तुमच्या कामात यश मिळण्याची आशा आहे. या काळात तुमच्या कार्यालयीन कामांना महत्त्व दिलं जाईल आणि अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुम्ही नवीन नोकरी पाहू शकता. तुमच्यापैकी काहींना तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी आहे. मालमत्तेच्या विक्रीबाबत निर्णय घेता येईल. नातं मजबूत करण्यासाठी जोडीदारासोबत वेळ घालवा. निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम सुरू करा.

वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope May 2024)

करिअरच्या दृष्टीकोनातून सध्याचा काळ उत्तम आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभ होईल. या कालावधीत एखाद्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा तुमचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होईल. विवाहासाठी नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. अनावश्यक गोष्टींवर वेळ आणि पैसा वाया घालवणं टाळावं. तुम्हाला जीवनात एकटेपणा जाणवेल. ताप आणि डोकेदुखी त्रासदायक ठरू शकते.

धनु (Sagittarius Monthly Horoscope May 2024)

या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या करिअरबद्दलच्या अनिष्ट चिंता दूर होतील. नोकरी बदलताना काळजी घ्यावी. व्यवसायात कोणतेही नवीन निर्णय घेणं टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकतं. एकमेकांवर तितका विश्वास नसल्याने प्रेमात चढ-उतार येतील.  कुटुंबात सुरू असलेले वाद कमी होतील.

मकर (Capricorn Monthly Horoscope May 2024)

कामात चढ-उतार जाणवू शकतात. विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. नवीन व्यवसाय योजना तयार केल्यास यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भविष्याची योजना करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या.

कुंभ (Aquarius Monthly Horoscope May 2024)

नोकरीत तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जातील. मे महिन्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार देखील करू शकता. नवीन व्यवसायाच्या संधी उघडतील, तुम्हाला यातून चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात. आपली चूक कबूल केल्याने समस्या आणखी वाढेल. पूर्वीचे कौटुंबिक वाद सुटतील. आपलं पोट आणि त्वचा निरोगी ठेवा.

मीन (Pisces Monthly Horoscope May 2024)

तुम्ही करिअरमध्ये अधिक उत्साही दिसाल, पूर्ण महिनाभर चांगल्या पद्धतीत काम करा. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते, संधीचा फायदा घेण्यासाठी सज्ज व्हा. व्यवसायाशी संबंधित लोक धाडसी निर्णय घेऊ शकतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं ही चांगली कल्पना आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र मौल्यवान वेळ घालवाल. फिरताना काळजी घ्या, तुम्हाला किरकोळ दुखापत होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Monthly Career Horoscope May Month 2024 : मे महिन्यात 'या' 5 राशींच्या करिअरमध्ये प्रचंड बदल घडतील; प्रत्येक स्वप्नं होईल साकार; वाचा मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget