Dev Uthani Ekadashi 2024 : देवउठनी एकादशीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 गोष्टी करु नका; देव होतील नाराज
Dev Uthani Ekadashi 2024 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे.
Dev Uthani Ekadashi 2024 : आज सर्वत्र कार्तिकी एकादशी साजरी केली जातेय. कार्तिकी एकादशीलाच (Kartiki Ekadashi) देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे.
प्रबोधिनी एकादशी हा चातुर्मासाचा सर्वात शेवटचा काळ आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागतात. तसेच, देवउठनी एकादशीपासून सर्व शुभ कार्याची सुरुवात करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे देवउठनी एकादशीचं महत्त्व आहे त्यानुसार या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
देवउठनी एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी करु नका
- देवउठनी एकादशीच्या दिवशी मद्यपान, मांसाहारी पदार्थ, कांदा, लसूण यांचं सेवन करु नये. या दिवशी फळ आणि दुधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
- देवउठनी एकादशीच्या दिवशी किंवा अन्य एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कारण हे अशुभ मानलं जातं. तुम्ही एकादशीच्या एक दिवसाआधी तुळशीची पानं तोडू शकता.
- देवउठनी एकादशीच्या दिवशी ॐ नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना तुळशी पत्राबरोबर नैवेद्य दाखवावा. याशिवाय या शुभ दिनी भगवान विष्णूला कमळाचं फूल चढवावं.
- देवउठनी एकादशीच्या एक दिवसाआधी केस धुवून घ्या. एकादशीच्या दिवशी केस धुवू नका.
- एकादशीच्या दिवशी भक्तांनी निद्रा करु नये. विशेषत: जे उपवास करतायत त्यांनी झोपूनये. तसेच. या दिवशी खोटं बोलू नये. अपमानकारक भाषेचा वापर करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kartiki Ekadashi Upay: काही केल्या लग्नच ठरत नाहीये? वैवाहिक जीवनात अडचणी? कार्तिकी एकादशीला करा 'हा' प्रभावी उपाय