एक्स्प्लोर

Kartiki Ekadashi Upay: काही केल्या लग्नच ठरत नाहीये? वैवाहिक जीवनात अडचणी? कार्तिकी एकादशीला करा 'हा' प्रभावी उपाय

Kartiki Ekadashi 2024 : जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, जोडीदाराशी सतत भांडणं होत असतील किंवा अविवाहितांची लग्न ठरत नसतील, तर त्यांनी देवउठनी एकादशीच्या दिवशी एक उपाय अवश्य करावा.

Kartiki Ekadashi 2024 Remedies : कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी, देवउठनी एकादशी असंही म्हणतात. कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2024) म्हणजेच देवउठनी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या तिथीपासूनच शुभ कार्यक्रम सुरू होतात. देवउठनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा लग्न जुळण्यात अडथळे येत असतील तर या दिवशी काही उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल. लग्नात होणारा विलंब कसा दूर करायचा? ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय जाणून घ्या.

विष्णूंचा आवडता दिवस म्हणजे एकादशी

शास्त्रानुसार, भगवान विष्णूंचा सर्वात आवडता दिवस म्हणजे एकादशी होय, त्यात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अधिक महत्त्वाची ठरते. धार्मिक ग्रंथानुसार, कार्तिक महिन्यातील या एकादशी तिथीला भगवान विष्णू पाच महिन्यांनी आपल्या योगनिद्रेतून जागे होतात. म्हणून याला देवउठनी किंवा कार्तिकी एकादशी म्हणतात.

आजपासून शुभ कार्याला सुरुवात

यंदा देवउठनी एकादशी गुरुवारी, 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू पाच महिन्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतात. वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा लग्नाला उशीर होण्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, तर देवउठनी एकादशीचा दिवस उपायासाठी उत्तम आहे.

कार्तिकी एकादशीला करा 'हे' उपाय

जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, जर बऱ्याच काळापासून एखाद्याचं लग्न ठरत नसेल तर त्यांनी देवउठनी एकादशीच्या दिवशी हे उपाय करून सर्व अडथळ्यांमधून बाहेर पडू शकता.

  • तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी. 
  • याशिवाय भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण केल्याने लग्न लवकर होण्याची शक्यता वाढते.
  • भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी केशर, पिवळे चंदन किंवा हळदीचा टिळा लावावा. 
  • जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवउठनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. 
  • पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. जल अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget