एक्स्प्लोर

Dev Diwali 2022 : देव पृथ्वीवर येऊन साजरी करतात दिवाळी; काय आहे 'या'मागचं कारण आणि 'देव दिवाळी'चं महत्त्व?

Dev Diwali 2022 : हिंदू धर्मानुसार, कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. जाणून घ्या 'देव दिवाळी'चं महत्त्व तिथी, शुभ मुहूर्त आणि विधी...

Kartik Purnima 2022 Date Importance : आज 'कार्तिक पौर्णिमा' आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'कार्तिक पौर्णिमा' ( Kartik Purnima ) असं म्हणतात. यावर्षी कार्तिक पौर्णिमा सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी  आहे. कार्तिक पौर्णिमेला 'देव दिवाळी' ( Dev Diwali ) असंही म्हटलं जातं. शास्त्रानुसार याच दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता असंही म्हटलं जातं. यामुळे देवांनी उत्साहात दिवाळी साजरी केली होती, त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळी असंही म्हणतात.

सर्व देव पृथ्वीवर येत दिवाळी साजरी करतात, अशी मान्यता

पौराणिक मान्यतेनुसार, त्रिपुरासुर राक्षसावर भगवान शिवाचा विजय साजरा करण्यासाठी देव दिवाळी साजरी केली जाते. देव दिवाळी दिवशी सर्व देव पृथ्वीवर येतात आणि काशीमध्ये दिवाळी साजरी करतात, अशीही मान्यता आहे म्हणूनच याला 'देव दिवाळी' म्हणतात. या दिवशी दीपदान म्हणजेच दिवे दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. देव दिवाळीची तारीख, शुभ मुहूर्त, विधी आणि दीपदानाचे महत्त्व जाणून घ्या.

कधी आहे देव दिवाळी 2022?

देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी कार्तिक पौर्णिमा तिथी 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4:15 पासून सुरू होत असून 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:31 वाजता संपेल. त्यामुळे देव दिवाळी 07 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल.

देव दिवाळी 2022 मुहूर्त ( Dev diwali 2022 Muhurat )

  • कार्तिक पौर्णिमा सुरुवात : 07 Nov 2022, सायंकाळी 04.15 वाजता
  • कार्तिक पौर्णिमा समाप्ती : 08 Nov 2022, सायंकाळी 04.31 वाजता
  • दिवे दान करण्याचा मुहूर्त ( प्रदोष काळ ) : 07 Nov 2022, सायंकाळी 5.14 ते 7.49 वाजेदरम्यान

दिवे दान करण्याचं महत्त्व काय? ( Deep Daan Importance )

पौराणिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव काशीच्या गंगा घाटावर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. यावेळी देव काशी घाटावर स्नान करतात. या दिवशी प्रदोषकाळात दिवे दान केल्याने दु:ख दूर होतं, अशी मान्यता आहे. दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या आयुष्यातील अंधार, नैराश्य दूर होईल, असंही म्हटलं जातं. तसेच यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभतं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे देव दिवाळीला दिवे दान केल्याने यम, शनी, राहू-केतू यांचे वाईट प्रभाव कमी होतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक जीवन सुखी होतं, असाही समज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
November 2026 Monthly Horoscope : वृषभ, तूळसह 'या' राशींसाठी नोव्हेंबरचा महिना भाग्यशाली; धनलाभाचा सुवर्णयोग, करिअरलाही मिळणार नवी दिशा, वाचा लकी राशी
वृषभ, तूळसह 'या' राशींसाठी नोव्हेंबरचा महिना भाग्यशाली; धनलाभाचा सुवर्णयोग, करिअरलाही मिळणार नवी दिशा, वाचा लकी राशी
Chanakya Niti : 'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
Guru Gochar 2026 : सिंह राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण! गुरुच्या संक्रमणामुळे 7 राशींच्या अडचणीत होणार वाढ...पदोपदी संकटाचा इशारा
सिंह राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण! गुरुच्या संक्रमणामुळे 7 राशींच्या अडचणीत होणार वाढ...पदोपदी संकटाचा इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Embed widget