Budh Transit 2025: अवघ्या काही तासांतच 'या' 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होतोय! बुध ग्रहाचे महासंक्रमण, कुबेराचा खजिना उघडणार, पैसा होईल डबल
Budh Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, दसरा होताच बुध ग्रह शुक्राच्या तूळ राशीत संक्रमण करत आहे, या महासंक्रमणामुळे 5 राशींना मोठा फायदा होईल.

Budh Transit 2025: 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याचा (Dussehra 2025) सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला, हिंदू धर्मात तसेच ज्योतिषशास्त्रात या सणाला मोठे महत्त्व आहे. दसरा होताच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबरच्या दिवशी बुध ग्रह (Budh Transit 2025) शुक्राच्या तूळ राशीत संक्रमण करत आहे. या महासंक्रमणामुळे 5 राशींना मोठा फायदा होईल. 3 ऑक्टोबरपासून कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील? जाणून घ्या...
बुध ग्रहाचे हे संक्रमण 5 राशींसाठी अत्यंत शुभ
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध, शुक्राच्या तूळ राशीत संक्रमण करत आहे. व्यवसाय, बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक बुध, सुख आणि समृद्धीचा कर्ता शुक्राच्या घरात प्रवेश करेल. 3 ऑक्टोबर 2025 रोजी बुध तूळ राशीत संक्रमण करेल. 24 ऑक्टोबरपर्यंत बुध तूळ राशीत राहील आणि नंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण पाच राशींसाठी अत्यंत शुभ राहील. 3 ऑक्टोबरपासून कोणत्या राशींचे नशीब पालटणार ते जाणून घ्या. या महासंक्रमणामुळे 5 राशींना मोठा फायदा होईल. जाणून घ्या...
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश मेष राशींना लाभदायक ठरू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील, प्रेम आणि विश्वास वाढेल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकेल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या संक्रमणामुळे मिथुन राशीला खूप फायदा होईल, कारण बुध या राशीचा स्वामी ग्रह आहे. तुमच्या निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. तुम्हाला परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
कन्या (Virgo)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध या व्यक्तींना फायदा देईल. आर्थिक लाभ होतील. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. पदोन्नती शक्य आहे. या वेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नातेसंबंध सुधारतील.
तुळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध तूळ राशीत भ्रमण करत आहे आणि या व्यक्तींना महत्त्वपूर्ण फायदे देईल. व्यवसाय आणि करिअरमध्ये लाभ होतील. आदर वाढेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाची व्यवस्था केली जाऊ शकते. एकंदरीत, हा काळ जीवनाच्या अनेक क्षेत्रात लाभ देईल.
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाचे भ्रमण कुंभ राशीला शुभ परिणाम देईल. तुम्हाला नवीन करिअरच्या संधी मिळतील. तुम्ही कामासाठी प्रवास करू शकता. तुमच्या तार्किक क्षमता सुधारतील. तुमची सामाजिक स्थिती वाढेल. आर्थिक प्रगती होईल.
हेही वाचा :
Shani Transit 2025: दसरा होताच 'या' 3 राशींची पाचही बोटं तुपात! शनिचा नक्षत्र बदल बनवणार कोट्यधीश, करिअर जोरात, बक्कळ पैसा येण्याचे संकेत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















