Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथाचा आशीर्वाद, चौफेर होणार धनलाभ
Astrology Panchang Yog 5 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 5 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 मे म्हणजेच आजचा दिवस सोमवार. आजचा दिवस हा भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी वैशाख शुक्ल अष्टमी तिथी आहे. चंद्राने गुरुच्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गजकेसरी योग (Yog) निर्माण झाला आहे. तसेच, आजच्या दिवशी वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला चौफेर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कामाने इतर प्रभावित होतील. तुमच्या वाणीवर तुमचा आज चांगला ताबा राहील. तसेच, नवीन संधी समोरुन तुमच्यासमोर चालून येतील. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस दुप्पट लाभ देणारा आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा चांगला सहभाग पाहायला मिळेल. नवीन संधी तुम्हाला मिळतली. मुलांच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला थोडी चिंता वाटेल. अशा वेळी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. मुलांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. तसेच, लवकरच फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. भावा बहिणींबरोबर तुमचे चांगले संबंध असतील. आज कोणाशीही तुम्ही वाद घालणार नाही. तसेच, तुमचा सकाळपासून दिवस फार उत्साहित राहील. मित्र-परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज चंद्र सप्तम चरणात असल्यामुळे तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामकाजात तुम्ही व्यस्त असाल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही चांगला व्यवहार करु शकाल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















