Astrology : आज मालव्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, पैशांचा पडणार पाऊस
Astrology Panchang Yog 18 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 18 April 2025 : आज 18 एप्रिल म्हणजेच शुक्रवारचा दिवस. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी ग्रहांची स्वामी शुक्र ग्रह गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत आल्यामुळे मालव्य राजयोग (Yog) निर्माण झाला आहे. यामुळे अनेक राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहील. तसेच, अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. या राशींच्या कामकाजात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासमोर मोकळे होतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्यामुळे तुम्हाला कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. आज नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर पडू शकतात. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला काही बदल करावे लागतील. तरच ग्राहक आकर्षित होऊ शकतात. सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जोडीदाराची साथ तुमच्याबरोबर असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो. तसेच,जर तुम्हाला नवीन वस्तूंची काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. पैशांची गुंतवणूक देखील तुम्ही करु शकता. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं प्रामाणिक फळ मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती आज चांगली असणार आहे. फक्त सकस आहार घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कामकाजात चांगली प्रगती दिसून येईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमचं वैवाहिक जीवन सुखी असेल. तसेच, मुलांच्या बाबतीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















