एक्स्प्लोर

Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी एकादशीला जुळून आले अनेक शुभ योग; 'या' राशींवर राहणार पांडुरंगाची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत

Panchang 17 July 2024 : आज बुधवारचा दिवस हा आषाढी एकादशीसह अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 3 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 3 राशींवर आज विठुरायाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 17 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज बुधवार, 17 जुलै रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. आज नवपंचम योग तयार होत आहे. तसेच, आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे आणि ही तिथी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आजपासून चातुर्मास देखील सुरू होत आहे.

आज एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, बुद्धादित्य योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. यानुसार आज कोणत्या 3 राशींना (Zodiac Signs) नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार आणि पांडुरंगाची कृपा लाभेल? जाणून घेऊया

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज सुज्ञ निर्णय घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना यश मिळेल. व्यावसायिक अधिक नफा कमावण्यात यशस्वी होतील आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील. त्याच वेळी, नोकरदार लोकांना आज इतर कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते. सासरच्या लोकांशी संबंध दृढ होतील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे संबंधही दृढ राहतील.लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज चालू असतील तर आज ते दूर होतील आणि नाती पुन्हा घट्ट होतील.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. आज एकादशी तिथी असल्यामुळे सिंह राशीचे लोक धार्मिक कार्यात सक्रिय भाग घेतील आणि प्रत्येक काम लक्ष देऊन पूर्ण करतील. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा गुंतवणुकीतून पैसे मिळतील आणि कर्जातूनही सुटका मिळेल. नोकरदार लोकांना आज पदोन्नती आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या पालकांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने तुमची अनेक कामं पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही गुंतवणूकही करू शकता. वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

कन्या रास (Virgo)

देवशयनी एकादशीचा कन्या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या राशीच्या लोकांची प्रत्येक वाटेवर प्रगती होईल. अनेकांना प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या सुवर्ण संधी मिळतील. तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. व्यावसायिकांना लाभाच्या संधी उपलब्ध होतील. घरातील वातावरण आज प्रसन्न राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त दिसाल, तुमच्या मुखी विठुनाम राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ashadhi Ekadashi Wishes : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल! आषाढी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Praniti Shinde Speech Solapur : मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा, प्रणितींचा पालकांना सल्लाRavindra Chavan on Shivaji Maharaj Statue : रवींद्र चव्हाण यांनी नौदलावर जबाबदारी ढकलली?Aaditya Thackeray Sambhajinagar : शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरे यांची मागणीSindhudurg  Shivaji Maharaj Statue : कोण जबाबदार, नौदल की सरकार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली
Wardha News : जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला
चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला
Embed widget