Ashadhi Ekadashi Wishes : आषाढी एकादशीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Ashadhi Ekadashi 2024 Wishes : यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. या दिवशी सारा आसमंत विठुभक्तीत तल्लीन झालेला दिसतो, तुम्हीही या दिवशी तुमच्या प्रियजनांना एकादशीचे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Ashadhi Ekadashi Wishes In Marathi : हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणून संबोधलं जातं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, ही देवांची रात्र असते, या दिवसानंतर देव झोपी जातात आणि चातुर्मास सुरू होतो.
महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी होत आहे, या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना आषाढीचे हे खास शुभेच्छा संदेश (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi) पाठवू शकता आणि दिवस विठुमय करू शकता.
आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे!
आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम राहो…
जय हरी विठ्ठ्ल!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
तुझा रे आधार मला
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा
चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल माझा ध्यास,
विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास,
विठ्ठल माझा आभास,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चला पंढरीसी जाऊ,
रखमादेवीवरा पाहू,
डोळे निवतील कान,
मना तेथेचि समाधान,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवल पांडुरंग
जय जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आता कोठें धावे मन,
तुझे चरण देखलिया,
भाग गेला शीण गेला,
अवघा झाला आनंद
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशी निमित्त
तुमच्या मनातील सार्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत
हीच आमची शुभकामना!
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे!
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!
हेही वाचा: