Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर करा 'हे' उपाय, होईल धनवृष्टी, घरात वास करेल लक्ष्मी
Surya Grahan 2022 : आजचे सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. अशा स्थितीत भारतातील लोकांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. रीही, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सूर्यग्रहणानंतर करणे आवश्यक आहे.
Surya Grahan 2022 : आज सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. मात्र, आजचे सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. अशा स्थितीत भारतातील लोकांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तरीही, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सूर्यग्रहणानंतर करणे आवश्यक आहे. कारण हे उपाय खूप प्रभावी मानले जातात. सूर्यग्रहणानंतर हे उपाय केल्यास धनप्राप्ती होते आणि घरात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते.
सूर्यग्रहण संपल्यानंतर लोकांनी स्नान करावे. त्यानंतर माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करा आणि तिची पूजा करा. यानंतर कुटुंबासह प्रार्थना करा. यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.
एक कमळाचे फूल घेऊन त्यावर कुंकू टाका आणि वाहत्या पाण्यात टाका. तसेच आपल्या लाडक्या देवाकडे प्रार्थना करा की या फुलाने कुटुंबातील सर्व दु:ख, वेदना, संकटे, दारिद्र्यही दूर व्हावे. घरात लक्ष्मीचा वास असो.
हे उपाय करा
एक वाटी मैदा, एक वाटी तांदूळ, एक वाटी काळी उडीद, एक वाटी डाळ आणि थोडे पैसे हातात घेऊन देवाचे ध्यान करा आणि प्रार्थना करा की हे भगवान, सूर्यग्रहणाचे अशुभ फळ आपल्या कुटुंबाला कधीही त्रास देऊ नये.
सूर्यग्रहण कुठे दिसणार?
30 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त अंटार्क्टिका, अटलांटिक, पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
महत्वाच्या बातम्या :