एक्स्प्लोर

Horoscope Today, April 30, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींच्या लोकांनी वादापासून दूर राहावे! जाणून घ्या आजचं राशीभविष्य..

Horoscope Today, April 30, 2022 : मिथुन, सिंह राशींच्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Horoscope Today, April 30, 2022 : अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी चंद्र अश्वनी नक्षत्रात आणि मेष राशीत असेल. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीमध्ये सूर्य आणि चंद्र एकत्र आहेत. मिथुन, सिंह राशींच्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : नोकरीत परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. प्रवास लाभदायक ठरेल. आज दिवसभर मन प्रसन्न राहील. संयम वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमात मतभेद होऊ शकतात. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती ठीक राहील. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. रागाच्या भरात कोणाशीही कठोर शब्द बोलू नये.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. नोकरी व्यवसायात असाल, तर तुमची कामाची स्थिती सुधारणार आहे. मान-सन्मान मिळेल. बौद्धिक कामातून उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. बोलताना संयम ठेवा. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. प्रवास घडण्याची शक्यता आहे. याकाळात कुटुंबापासून दूर जाऊ शकता.

मिथुन (Gemini Horoscope) : आज अनावश्यक धावपळ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. रागाचा अतिरेक होईल. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिक स्थिती ठीक राहील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. कुटुंबातील सदस्यांसोबत दीर्घकाळ चाललेले मतभेद संपतील. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. बँकिंग कामाशी संबंधित लोकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये नवीन प्रकल्प मिळाल्याने आनंद होईल. अनावश्यक वाद आणि भांडणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.  

सिंह (Leo Horoscope) : आज प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात काही बदल होण्याची शक्यता आहे. लाभाच्या संधी मिळतील. वाहन खरेदीचे नियोजन केले जाईल. निष्काळजीपणामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. कोर्ट-कचेरी प्रकरणात अडकू नका. पिढीजात मालमत्तेची काही विभागणी होऊ शकते.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा खर्चिक असेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही नवीन खर्च येऊ शकतात, ज्यामुळे चिंता वाढेल. व्यावसायिक स्थिती ठीक राहील. आज कोणत्याही प्रकारची नवी गुंतवणूक करू नका. प्रियजनांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

तूळ (Libra Horoscope) : आज दिवसभर मन प्रसन्न राहील. बोलण्यात संयम राखण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक समस्यांकडे लक्ष द्या. उत्पन्न कमी आणि खर्च वाढू शकतो. व्यवसायात थोडी तणावाची स्थिती निर्माण होईल. धार्मिक कल वाढेल. कुटुंबातील एखादा सदस्य मदत करण्यास नकार देऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही त्यांच्यावर मात कराल. नशिबावर जास्त अवलंबून राहू नका. आर्थिक बाबतीत थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. अचानक आर्थिक मदत मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत उत्साह राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासात, परीक्षेत यश मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक स्थिती ठीक राहील. भावनेच्या आहारी जाऊन आज कोणताही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन साधन शोधू शकता. खर्चाच्या अतिरेकीमुळे त्रास होईल. त्यामुळे साठवलेला पैसा कमी होऊ शकतो. आरोग्याबाबत सावध राहा

मकर (Capricorn Horoscope) : आज व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत अधिकाऱ्यांशी सलोख्याने वागा. भावंडांशी वैचारिक मतभेद वाढू शकतात. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना परदेशी कंपन्यांकडून ऑफरही मिळू शकतात. शत्रूंवर विजय मिळवाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. जर कोणाशी वाद झाला असेल, तर अशावेळी मौन बाळगणे चांगले राहील.

कुंभ (Aquarius Horoscope) : ऑफिसमध्ये काम करताना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा तुमच्याकडून चूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखू शकता. प्रेम आणि मुलांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा काळ चांगला जाईल. आज कोणताही निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नका. कामाच्या संदर्भात जे नियोजन केले आहे, ते यशस्वी होईल,

मीन (Pisces Horoscope) : आज ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढणार आहेत, अधिकारासोबत जबाबदारीही वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अविवाहितांना चांगली स्थळे सांगून येतील. इतर कोणाला पैसे उधार देणे टाळा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. भौतिक सुख आणि संपत्ती वाढेल. आज कोणाशीही कठोर भाषेत बोलू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget