(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rabi crops procurement : दिल्लीत 2016-17 पासून रब्बी पिकांची आधारभूत किंमतीनं खरेदी नाही, दिल्ली सरकारच्या अभ्यासातून माहिती समोर
भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) 2016-17 पासून दिल्लीत रब्बी पिकांची (Rabi crops) आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Rabi crops procurement : भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) 2016-17 पासून दिल्लीत रब्बी पिकांची (Rabi crops) आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली सरकारच्या अंतर्गत नियोजन विभागानं केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत बघितलं तर सर्वसाधारणपणे खरेदी अत्यंत कमी झाली आहे. मात्र, 2016 पासून आधारभूत किंमतीने पिकांची खरेदी शून्य झाली आहे.
2016 पूर्वी देखील दिल्लीत रब्बी पिकांची आधारभूत किंमतीने खूप कमी प्रमाणात खरेदी झाली आहे. 2011-12 मध्ये 4 हजार 763 मेट्रिक टन झाली होती. तर 2012-13 मध्ये 13 हजार 524 मेट्रिक टन खरेदी झाली होती. FCI प्रादेशिक कार्यालयाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे ही माहिती मिळाली आहे. नरेला आणि मायापुरी येथील अन्न स्टोअरेज डेपोमध्ये कोणतीही खरेदी झाली नाही. 2013-14 मध्ये नजफगढ मंडईमध्ये केवळ 18 मेट्रिक टन खरेदी झाली होती. 2015-16 मध्ये, नरेला येथे 116 मेट्रिक टन आणि नजफगड मंडी येथे 1,671 मेट्रिक टन धान्याची खरेदी झाली. त्यानंतर, 2016-17 ते 2020-21 पर्यंत, खरेदी शून्य राहिली असल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे.
किमान आधारभूत किंमती (MSP) या शेतकर्यांना त्यांच्या पिकांसाठी दिलासा मिळवून देणाऱ्या असतात. कारण बाजारात एखाद्या पिकाची किंमत कमी झाली तर शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीता आधार मिळतो. त्यामुळं होणाऱ्या तोट्यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मात्र, 2016 पासून FCI कडून MSP वर कोणतीही खरेदी केली नसल्याचे समोर आले आहे. अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला, चारा आणि फुले यांच्या विपणनासाठी दिल्लीमध्ये एकूण 8 कृषी मूल्य आणि विपणन समित्या (APMC) आहेत. यापैकी नरेला आणि नजफगढ येथील दोन अधिक प्रस्थापित आहेत. या ठिकाणी शेतकरी त्यांचे अन्नधान्याची विक्री करतात.
दरम्यान, दिल्लीतील रब्बी हा प्रमुख उत्पादन हंगाम आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड ही गहू पिकाची असते. गहू हे प्रमुख पीक आहे. ज्याची लागवड एकूण कार्यक्षेत्राच्या 67 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर केली जाते. जवळपास 83,000 टन गव्हाच्या पिकाचे दिल्लीत उत्पादन घेतलं जाते. तर इतर प्रमुख पीक म्हणजे भात हे आहे. भाकाचे उत्पादन हे जवळपास 17 हजार टन होते.
महत्वाच्या बातम्या: