Maharashtra: हिंगोलीचे कलिंगड थेट काश्मीर दरबारी, 19 टन कलिंगडातून दोन लाखाचा नफा
Maharashtra: हिंगोली जिल्ह्यात उत्पादन घेतलेल्या कलिंगडाला आता थेट जम्मू-काश्मीरला मागणी होऊ लागली आहे.
Maharashtra: हिंगोली जिल्ह्यात उत्पादन घेतलेल्या कलिंगडाला आता थेट जम्मू-काश्मीरला मागणी होऊ लागली आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने जम्मू कश्मीरला या कलिंगडाची मोठी मागणी असते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सांडस येथील शेतकरी विनायक धावंडकर यांनी 19 टन कलिंगड जम्मू- काश्मीर ला विक्रीसाठी पाठवले. यातून त्यांना खर्च वाजा केल्यास दोन लाखाचा नफा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सांडस या गावचे शेतकरी विनायक धावंडकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या एक एकर शेत जमिनीवर कलिंगड पिकाची लागवड केली. कलिंगड या पिकाची लागवड विनायक यांना काही नवीन नाही. कारण गेल्या काही वर्षापासून विनायक दरवर्षी टरबुजाचे उत्पादन घेतात. त्याप्रमाणे याही वर्षी कलिंगडाची लागवड केली. कलिंगडाची लागवड केल्यानंतर दररोज या कलिंगडाला ठिबक च्या माध्यमातून पाणी देणे त्याच बरोबर वेळेवर खत आणि औषधांची फवारणी करणे याच सूत्र लक्षात येणे खूप गरजेचं होतं आणि गेल्या अनेक दिवसापासून कलिंगडाची लागवड विनायक धावंडकर करत असल्यामुळे त्यांना हे सूत्र अगदी तंतोतंत अवगत होते.
कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर रोपटे लहानाचे मोठे होई पर्यंत विनायक धावंडकर यांनी कलिंगडाच्या वेलांची अगदी नियोजनबद्ध काळजी घेतली. लागवडी नंतर ठीक तीन महिन्यात उत्पादन तयार झाले काही कलिंगड लहान तर काही कलिंगड मोठे आशा स्वरूपाचे वेगवेगळ्या वजनाचे कलिंगड तयार झाले. हे उत्पादन घेण्यासाठी विनायक यांना एकूण 60 हजार रुपयांचा खर्च आला होता. उत्कृष्ट दर्जाचे आणि आकाराने मोठे कलिंगड तयार झाले. परंतु हे कलिंगड विकायचे कुठे? हा प्रश्न विनायक यांच्या समोर उभा राहिला होता मित्राच्या मदतीने विनायक यांनी शक्य होईल असे सर्व बाजाराची माहिती घेतली परंतु योग्य बाजार भाव मिळत नव्हता अखेर जम्मु काश्मीर येथे रमजान महिन्यात कलिंगडाला मोठी मागणी आसते. ही माहिती मिळाली येथील एका व्यापाऱ्याने हे कलिंगड चांगल्या भावाने खरेदी करण्याची हमी दिल्यावर विनायक यांनी कलिंगड जम्मू काश्मीर येथे पाठवायचे ठरवले.
विनायक यांनी स्वतः च्या शेतातील 3 ते4 किलो वजनाचे सर्व कलिंगडाची तोडणी करून काश्मीर ला पाठवायची तयारी केली. एकूण 19 टन कलिंगड जम्मु काश्मीर येथे पाठवण्यासाठी तयार ठेवण्यात आले आणि एका ट्रक मधून त्यांनी हे कलिंगड जम्मू काश्मीरला पाठवले. या कलिंगडाच्या विक्रि मधून विनायक यांनी एकूण दोन लाख रुपये नफा मिळवला आहे. पुढील काळात आजुन मोठ्या क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करायचा विनायक यांचा मानस आहे ते सर्व कलिंगड सुध्धा जम्मू काश्मीर येथे पाठवायचे आहेत.
हे देखील वाचा-
- Coronavirus New XE Variant : देशातील XE व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत, घाबरण्याचं कारण नसल्याचा राजेश टोपेंचा निर्वाळा
- Ram Navami 2022 : शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ; मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, पालख्यांच्या आगमनाने साईनगरीत उत्साह
- Maharashtra News : न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात बेकायदा लाऊडस्पीकरची कारवाई पूर्ण नाही! : RTI