Dhule Cotton News : धुळ्यातील शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे, मका पिकाकडे फिरवली पाठ
धुळे (Dhule ) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा कपाशीकडे (Cotton) कल वाढला आहे. तर दुसरीकडं शेतकऱ्यांनी मका पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
Dhule Cotton News : राज्यातील बहुंताश भागात आत्तापर्यंत चांगला पाऊस (Rain) झाला आहे. काही ठिकाणी मात्र अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे. सुरुवातील जरी पावसानं ओढ दिली असली तरी जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या आहेत. दरम्यान, धुळे (Dhule ) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा कपाशीकडे (Cotton) कल वाढला आहे. तर दुसरीकडं शेतकऱ्यांनी मका पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
धुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा कपाशीकडे कल वाढला आहे. तर दुसरीकडे मका पिकाकडे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी पाठ फिरवली आहे. धुळे जिल्ह्यात यंदा जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेत 30 ते 35 हजार हेक्टरने कापसाचे क्षेत्र वाढलं आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कापसाची लागवड केली आहे. राज्यात उत्पादित होणारा कापूस पूर्वी परराज्यात जात होता. त्यामुळं अनेक उद्योजकांनी खानदेश सह अन्य भागात जुनी प्रेसिंग उद्योग सुरु केले. पण कालांतराने कपाशी उत्पादनाचा खर्च वाढला. दुसरीकडे भाव कमी मिळत असल्याने अनेकांनी कपाशीची लागवड करण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास प्राधान्य दिलं आहे. मात्र यंदा कपाशीला गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगला भाव मिळतो की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या कापसाच्या दराशी काय स्थिती
सध्या बाजारपेठेत कापसाच्या दरात घट झाल्याचे चित्र दिसत आहे. सद्या भारतीय बाजारपेठेत कापसाला प्रति 100 किलोला 8 ते 9 हजार रुपयांचा दर मिळत आहे. कापसाच्या दरात सध्या मोठी घट झाली आहे. कारण कापसाला 12 हजार रुपयांचा दर मिळत होता. कापसाचे दर उतरु लागल्यानं वस्त्र उद्योगाला नवी चिंता सतावण्याची शक्यता आहे. चालू खरीप हंगामात कापसाचे पीक अधिक येण्याची शक्यता असल्यानेचं कापसाच्या दरात घसरण होत आहे. सध्या कापसावरचे आयात शुल्क काढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 15 ते 20 टक्के कमी झाले आहेत. त्याचा परिणाम देखील भारतीय बाजारपेठांवर होत असल्याची माहिती वैराळे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन यावर्षी वाढण्याचा अंदाज आहे. देशातील उत्पादन सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. क्षेत्र वाढत आहे, त्यामुळं किंमती कमी होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Cotton Price : कापसाच्या दरात घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा परिणाम, वस्त्र उद्योगाला चिंता
- Yavatmal : कापसाच्या पंढरीत बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड; पाच लाख हेक्टरवर कपाशीचे नियोजन