(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunflower : सूर्यफुल शेती करा, कमी वेळात भरघोस नफा मिळवा; वाचा सविस्तर माहिती
सूर्यफुलाच्या लागवडीतून (Sunflower Farmin) कमी वेळात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. ही सूर्यफुलाची शेती नेमकी कशी करावी? याबद्दलची माहिती पाहुयात.
Sunflower Farming : शेतकरी (Farmers) सातत्यानं शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. विविध संकटांचा सामना करत भरघोस उत्पादन घेत आहेत. कमी खर्चात चांगला फायदा देणाऱ्या पिकांची लागवड करत आहेत. सूर्यफूल शेती देखील अशीच आहे. सूर्यफुलाच्या लागवडीतून (Sunflower Farmin) कमी वेळात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. ही सूर्यफुलाची शेती नेमकी कशी करावी? सूर्यफुलाची लागवड करताना शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी? याची सविस्तर माहिती पाहुयात
कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये सूर्यफुलाची लागवड
सूर्यफुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. देशातील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या राज्यात सूर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. सूर्यफुलाची शेती करताना शेतकऱ्यांनी फक्त सुधारित वाणांचीच निवड करावी, जेणेकरून अधिक बियाणे आणि तेलाचे उत्पादन घेता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सूर्यफुलाच्या वाणांचे संमिश्र आणि संकरीत वर्गीकरण करण्यात आले आहे. सूर्यफूलाचे पिकं हे 100 ते 120 दिवसांत तयार होते.
सूर्यफुलाची लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करा
सूर्यफुलाच्या सुधारित आणि संकरित वाणांची पेरणी करावी
शेतात चांगल्या उत्पादनासाठी कुजलेले शेण किंवा गांडूळ खत टाकावे.
शेतकरी नत्र, फॉस्फरस, पोटॅशियम, गंधक आणि सूक्ष्म घटकांचा वापर माती परीक्षण करुन करू शकता.
सूर्यफूल पिकावर फुलोऱ्याच्या वेळी बोरॅक्सची फवारणी केली जाते. जेणेकरून बियाण्याची गुणवत्ता अबाधित राहते.
निळ्या गायी आणि पक्षांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतातील तणांचेही नियंत्रण करावे.
सूर्यफूल शेतीचे फायदे काय?
तेलासाठी सूर्यफुलाची शेती केली जाते. पण अनेक कंपन्या त्यातून सौंदर्य उत्पादनेही तयार करतात. सूर्यफुलाचे तेल हे खाद्यतेल म्हणूनही वापरले जाते. सूर्यफुलांच्या सुधारित बियाणांची लागवड शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दरवर्षी सूर्यफुलाला मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव सूर्यफुलाची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.
महत्वाच्या बातम्या: