एक्स्प्लोर

Raju Shetti : सूरज तु आमदार, खासदार किंवा मंत्री असता तर तुझ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, 'त्या' शेतकरी आत्महत्येवरुन राजू शेट्टींचा निशाणा

ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील मंत्र्यांची आणि आमदार, खासदारांची नावे आहेत. यावरुन माजी खासदार राजू शेट्टींनी टीका केली आहे.

Raju Shetti : एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच दुसरीकडे अनेक ठिकाणी वीज कपात केली जात आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील मंत्र्यांची आणि आमदार, खासदारांची नावे आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वीज बिले थकित असल्याचे समोर आले आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. शेट्टी यांनी थकीत वीज कनेक्शनसाठी आत्महत्या केलेल्या पंढरपूरमधील एका शेतकऱ्याचा दाखला दिला आहे.  'सुरज  तु कदाचित आमदार, खासदार किंवा मंत्री असतास तर तुला थकीत वीज कनेक्शनसाठी आत्महत्या करण्याची वेळ आली नसती', असे शेट्टींनी म्हटले आहे.

काय होती घटना

वीज तोडणीला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येतील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सूरज जाधव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव होते. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून ही आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने आपला व्हिडिओ बनवला, आणि सोशल मिडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने परत शेतकरी जन्माला येणार नाही असे सांगितले आहे. यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. शेतमालाला भाव नाही म्हणून कर्जे घेऊन दूध व्यवसाय सुरु केला, पण दुधालाही दर मिळत नसल्याने निराश होत आता पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. 

कोणाकडे किती थकबाकी?

आरोग्यमंत्री राजेश टोपे याची चार लाख रुपये थकबाकी
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकी
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी
राज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहे
श्रीमंत युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934
माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे
भाजप आमदार जयकुमार गोरे सात लाख रुपये थकबाकी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70  हजार रूपये थकबाकी
आमदार समाधान आवताडे एकूण वीस हजार थकबाकी
आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी
आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार विज जोडणीतील तीन लाख रुपये
आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत
माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत
शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत
आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत
आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगीक विज जोडणीची  2 लाख 80 हजार थकबाकी
माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी
माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी
मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी
खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी
आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी
आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी
राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी
आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत
आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये
माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी
सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435
 
महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget