एक्स्प्लोर

Pandharpur News : वीज तोडणीचा पंढरपूरात पहिला बळी, Video शेअर करत शेतकऱ्याने संपविले जीवन

Pandharpur News : वीज तोडणीचा पंढरपूर (Pandharpur News) तालुक्यात पहिला बळी गेलाय.

Pandharpur News : वीज तोडणीचा पंढरपूर (Pandharpur News) तालुक्यात पहिला बळी गेलाय. मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. माहितीनुसार, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून ही आत्महत्या झाल्याचे समजते, पोलीस याचा अधित तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने आपला व्हिडिओ बनवला, आणि सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने परत शेतकरी जन्माला येणार नाही असे सांगितले आहे. यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. 

"आता पुन्हा शेतकरी जन्म नको"

शेतमालाला भाव नाही म्हणून कर्जे घेऊन दूध व्यवसाय सुरू केला, पण दुढळही भाव मिळत नसल्याने निराश होत आता पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत तरुणाने आत्महत्या केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे . या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.  पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे राहणाऱ्या सूरज जाधव या २३ वर्षीय तरुणाने दोन दिवसापूर्वी आपल्या शेतात व्हिडिओ शूट करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला तातडीने त्याला उपचारासाठी पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.  मात्र आज दुपारी यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मगरवाडी गावातील त्याच्या घरी आणताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेला . 

सकारात्मक भूमिका घेऊन ठोस पावले उचलण्याची गरज
सुरज जाधव हा सुशिक्षित शेतकरी तरुण आपल्या लहानश्या जमिनीच्या तुकड्यात राबराब राबायचा. मात्र शेत मालाला भाव मिळत नसल्याने काही दिवसापूर्वी त्याने कलिंगडे वाटून टाकली होती. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने जनावरे वाढवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्याकडे 30 ते 35 जनावरे झाली होती. आता तो जनावरांच्या मागे दिवसभर राबत होता. यातूनच रोज 200 लिटर दुधाचे संकलन करून तो विकत असे . मात्र दुधाचे भाव देखील पडल्याने त्याला सर्वच शेती धंद्यात तोटा दिसू लागला. जगण्यासाठी शेती व्यवसाय करता करता त्याच्यावर जवळपास 20 लाखाचे कर्ज झाल्याचे त्याचे कुटुंबीय सांगतात. सगळीकडे प्रामाणिक कष्ट करूनही हातात काहीच लागत नाही, शेतीचा धंदा हा निव्वळ तोट्याचा धंदा बनल्याची सुराजाची मानसिकता बनली आणि त्याने आता पुन्हा शेतकरी म्हणून जन्माला यायचे नाही, असे म्हणत 2 मार्चला शेतात विषारी औषध प्राशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो शेतातून घरी आला, मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले होते. आज दुपारी त्याची प्राणज्योत मावळली. यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर आज दुपारी त्याचेवर त्याच्या शेतात अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरज सारखा उमदा तरुण आता शेतकऱ्याच्या घरात जन्म नको म्हणून आपली जीवनयात्रा संपवतो.  हे समाजाला नक्कीच भूषणावह नाही, आता राज्यकर्ता नावाच्या समाजाने जगाचा पोशिंदा आणि अन्नदाता असलेल्या बळीराजा बाबत सकारात्मक भूमिका घेऊन ठोस पावले उचलावी लागतील . 

शेतकरी संघटनेचे नेते तुपकर संतप्त

 सरकारच्या वीज तोडणी शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱयांना वेठीस धरणाऱ्या महावीतरणला वैतागून "परत शेतकरी म्हणून जन्माला येणार नाही "असं म्हणत त्याचा व्हिडीओ बनवून मगरवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच संतप्त झाले. या सरकारला लाज वाटली पाहिजे, थोड्या थोड्या कारणाने भांडण करणारे हे मंत्री आहेत , आता तर उर्जामंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे व शेतकऱ्यांच्या पोरांनी आता सारकारमध्यला मंत्र्यांना बदडल पाहिजे असं तुपकर म्हणाले. आत्महत्या नसून ही सरकारने व ऊर्जा मंत्र्याने शेतकऱयांना खोट बोलून ही हत्या केल्याचं स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर संतापाने म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2022: सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Maharashtra Budget Session 2022 : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी! भाषण 22 सेकंदात थांबवून राज्यपाल निघाले

Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणीCM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाबDevendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणाNarendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
Embed widget