Donkey Milk: बाप रे! 5,550 रुपये लिटरला गाढवाचे दूध विकून 'हा' माणूस झाला मालामाल; 'लिक्विड गोल्ड'ने केले श्रीमंत
Donkey Milk: गाय, म्हैस, बकरीचे दूध विकल्याचे तुम्ही पाहिले आणि ऐकले असेल. मात्र तामिळनाडूमध्ये एक व्यक्ती गाढवाचे दूध विकून लाखो रुपये कमवत आहे. या व्यवसायामुळे त्यांची दरवर्षी मोठी कमाई होत आहे.
Donkey Milk Benefit: तामिळनाडू (Tamilnadu) मधील एका शेतकऱ्याने गाढवाचं दूध (Donkey Milk) विकून लाखो रुपये कमावले आहेत. या पशुपालन करणाऱ्या एका व्यक्तीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जो लिक्विड गोल्ड (Liquid Gold) पासून लाखो रुपये कमावतो आहे.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध पावले उचलत असतात. शेतकर्यांसाठी सरकार पातळीवरून बियाणे आणि उपकरणांना सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर शेतकरी आपापल्या परीने शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवत असतात. त्याचबरोबर पशुपालन हेही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. अशाच एका पशुपालकाची ही गोष्ट आहे, जो दूध विक्रीतून लाखो रुपये कमवतोय.
5 हजार 550 रुपये प्रति लिटर दराने गाढवाच्या दूधाची विक्री
सहसा गाय, म्हैस, उंट, बकरी यांचे दूध विकल्याचं तुम्ही पाहिलं असेल. त्यांचं दूधही फारसं महाग नसतं. मात्र, गाढवाचं दूध विकून पैसे कमवणं हे स्वप्नासारखं असतं. पण बाबू उलगनाथन हे गाढवाच्या दूधाची विक्री करणारे तमिळनाडूतील वन्नारपेटचे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी गाढवाचं दूध विकण्याचं स्वप्न साकार केलं आहे.
गाढवाच्या दुधाने त्यांनी मोठं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं आहे. 2022 मध्ये त्यांनी भारतातील सर्वात मोठे गाढवाचे फार्म, द डाँकी पॅलेस (The Donkey Palace)ची देखील स्थापना केली. अनेक कॉस्मेटिक कंपन्यांनाही ते गाढवाचे दूध पुरवत आहे. त्याची किंमत 5,550 रुपये प्रति लिटर इतकी आहे. गाढवाच्या दुधाशिवाय गाढवाच्या दुधाची पावडर, गाढवाच्या दुधाचे तूपही इथे बनवले जाते.
असा सुरू केला व्यवसाय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबू उलगनाथन यांच्या टीमने आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन हॉर्स येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात भाग घेतला. तिथे त्यांनी गाढवं आणि त्यांच्यापासून केल्या जाणाऱ्या शेतीची माहिती घेतली. ICAR-NRCE ने त्यांना गाढवाचे फार्म (The Donkey Palace)ची स्थापना करण्यास प्रेरित केले.
व्यवसायादरम्यान करावा लागला आव्हानांचा सामना
तामिळनाडूत गाढवांची संख्या फारशी नाही. याशिवाय दूध देणारी गाढवंही सहा महिने एक लिटरपेक्षा कमी दूध देतात. अशा परिस्थितीत, गाढवाच्या दुधाच्या व्यवसायात स्वत:ला यशस्वी करणे हे उगलनाथन यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते.
पाच हजार गाढवांचे करतोय पालन
बाबू उलगनाथन आपल्या शेतात 5,000 गाढवं पाळत आहेत. यासाठी त्यांनी 75 हून अधिक फ्रँचायझी फार्म घेतले आहेत. गाढव पालनाबाबतही आता लोक त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधत आहेत. यासाठी, त्यांनी The Donkey Palace One Health – One Solution – एक संवर्धन, मनोरंजन आणि जागरूकता केंद्र देखील स्थापन केले आहे. त्यांचा हा व्यवसाय अमेरिका, युरोप, चीनसह इतर देशांशी जोडला गेला आहे.
गाढवाचे दूध हे तरल सोने मानले जाते
गाढवाच्या दुधाची किंमत जास्त असल्याने त्याला द्रवरूपी सोने असेही म्हणतात. हे केवळ त्वचेसाठीच फायदेशीर नाही, तर अनेक रोगांशी लढण्यासाठीही ते उपयुक्त आहे. त्याची चांगली गोष्ट म्हणजे, ते बरेच दिवस टिकवून ठेवता येते, तर इतर प्राण्यांचे दूध हे लवकर खराब होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Wheat Procurement : गहू खरेदीत 42 टक्क्यांची वाढ, पंजाब हरियाणा आघाडीवर; काही भागात अवकाळीचा फटका