(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture : मुलांना केमिकल मुक्त अन्न देण्यासाठी आई बनली शेतकरी! इतर महिलांसाठी बनली प्रेरणादायी, इंजिनिअर ते शेतकरी होण्याचा प्रवास
Agriculture Success Story : मुलाच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर त्या आईने सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली, आज त्या 1 एकर जमिनीवर केमिकल मुक्त शेती करत आहेत.
Agriculture Success Story : आपलं मूल निरोगी राहावं, आजारी पडू नये यासाठी प्रत्येक पालक (Child Care) आपल्या मुलांसाठी काळजी घेतात. मुलांना सकस आणि पौष्टिक आहार देणे हे देखील पालकांसाठी एक मोठे आव्हान आहे. विशेषत: त्या काळात जेव्हा बहुतांश शेतीचे व्यापारीकरण होत आहे. एकीकडे प्रदूषण (Global Warming) वाढत आहे, तर दुसरीकडे केमिकलयुक्त अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडत आहे. बाजारात उपलब्ध असलेले प्रत्येक उत्पादन तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही याची शाश्वती नसते. आज सर्व प्रकारच्या पिकांवर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात आहेत. या सर्व चिंतेने सुभाषश्री संथ्या यांना शेतकरी बनण्यास प्रेरित केले, जेणेकरून त्यांच्या मुलांना चांगले, निरोगी, सेंद्रिय आणि पोषणयुक्त अन्न मिळू शकेल. मात्र, हा प्रवास खूप संघर्षातून सुरू झाला. जाणून घ्या
इंजिनिअरींग आई ते शेतकरी होण्याचा प्रवास सुरू
सुभाषश्री म्हणतात, आयुष्यातील एखादी घटना त्यांना शेतीकडे वाटचाल करण्यास प्रेरित करेल असे यांना कधीच वाटले नव्हते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक केल्यानंतर सुभाषश्रीने मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. युवर स्टोरीमधील वृत्तानुसार, सुभाषश्री संथ्या यांचा 6 महिन्यांचा मुलगा कोविड-19 महामारीनंतर खूपच आजारी पडला होता. परिस्थिती इतकी वाईट झाली की, काही काळानंतर, मुलावर हृदय शस्त्रक्रिया देखील करावी लागली, या शस्त्रक्रियेनंतर मुलाला पूर्णपणे निरोगी ठेवायचे असेल तर सेंद्रिय, पौष्टिक आणि केमिकलमुक्त आहार द्यावा लागेल, असे डॉक्टरांचे कडक मार्गदर्शन होते. यानंतर सुभाषश्री यांनी घराच्या बाल्कनीतच काही फळे आणि भाज्यांची रोपे लावली. अशा प्रकारे नवी मुंबईत राहणाऱ्या सुभाषश्री संथ्याचा आई होण्यापासून ते शेतकरी होण्याचा प्रवास सुरू झाला.
लेकरासाठी सुभाषश्रीने नोकरी सोडली
सुभाषश्री संथ्या इंजिनिअर आहेत. शहरी जीवनशैलीत संथ्याला शेतीची फारशी कल्पना नव्हती. या क्षेत्राचा शोध घेण्यासाठी, सुभाषश्रीने तिची नोकरी सोडली आणि ताजी सेंद्रिय फळे आणि भाज्या कशा पिकवायच्या हे शिकायला सुरुवात केली. त्यासाठी तिने स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या भाज्या किंवा इतर कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्यास सुरुवात केली. या कंपोस्ट खतापासून भेंडी, पालक, टोमॅटो, भोपळा पिकवायला सुरुवात केली. आत्तापर्यंत ही शेती फक्त बाल्कनीतच केली जात होती, पण नंतर सुभाषश्रीही ताज्या आणि सेंद्रिय भाज्या पिकवून भाजीपाला पिकवायचा करायचा होता. मग सुभाषश्रीने आतापर्यंत तिच्या बचतीतून एक एकर जमीन खरेदी केली, जी तिच्या घरापासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर होती.
IIT मधून फार्मिंगची पदवी
आज सुभाषश्री संथ्या केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करत नाहीत, तर त्यांच्यासारख्या अनेक मातांसाठी प्रेरणा म्हणून उदयास आल्या आहेत. आयुष्यातील एका घटनेने सुभाषश्रीला प्रेरणा दिली. शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, सुभाषश्री संथ यांनी IIT खरगपूरमधून सस्टेनेबल फार्मिंगमध्ये पदवी देखील घेतली आहे. सुभाषश्रीने 'मड अँड मदर' नावाची स्वतःची कंपनीही स्थापन केली, जी सेंद्रिय खाद्यपदार्थांवर आधारित आहे.
सेंद्रिय शेतीची माहिती घेतली
सुभाषश्री संथ्या त्यांच्या ध्येयाविषयी सांगतात की, माझे ध्येय इतकेच आहे की, मुलांना केमिकलमुक्त, नैसर्गिक आणि आरोग्यदायी अन्न पुरवणे हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संथ्याने कोईम्बतूर आणि पुद्दुचेरी येथील शेतकऱ्यांकडून तीन महिन्यांपासून सेंद्रिय शेतीची माहिती घेतली आहे.
इतर बातम्या