एक्स्प्लोर

Sangli News : तरुण शेतकऱ्याची नामी शक्कल; स्वत:च्या गाडीतूनच विकली भाजी, मिळवला तिप्पट नफा

Sangli Atpadi Farmer : सांगलीच्या आटपाडीमध्ये आठवडी बाजारामध्ये एका शेतकऱ्याने चक्क आपल्या आलिशान इंडिव्हर गाडीतून मेथीची भाजी विक्री केली. यातून या तरुण शेतकऱ्याने तिप्पट नफा कमावला.

Sangli Atpadi Farmer : आटपाडीच्या आठवडी बाजारात आलिशान इंडिव्हर गाडीतून (Endeavour Car) शेतकऱ्याने मेथीच्या भाजीची विक्री केली. लिलावात दर न मिळाल्याने शेतकऱ्याने थेट ग्राहकाला मेथीची भाजी विकली. या विक्रीतून शेतकऱ्याला तीन पट दर मिळाला. आटपाडीमध्ये आठवडी बाजारामध्ये एका शेतकऱ्याने चक्क आपल्या आलिशान इंडिव्हर गाडीतून मेथीची भाजी विक्री केली. झरे येथील वामन गोरड असे या तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याने आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विक्रीचा निर्णय घेतला. वामन यांनी स्वतः थेट ग्राहकाला भाजी विक्री केल्याने यामधून त्यांना प्रत्येक पेंडी मागे लिलावापेक्षा तीन ते चार पट दर अधिक मिळाला. यामुळे शेतकऱ्याचा चांगला नफा झाला आहे.  अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या माला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडतात आणि हताश होतात, पण या तरुण शेतकऱ्याने या संकटावर मात केली आहे.

आपल्या शेतामध्ये लावलेली मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी वाहन भाडे करून जाणे आणि लिलावात मिळणारा दर याला एका शेतकऱ्याने पर्याय शोधला आहे. आपल्या स्वत:च्या मालकीच्या आलिशान इंडिव्हर गाडीतूनच मेथीची भाजी शेतकऱ्याने आटपाडीमध्ये शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये आणली. शेतकऱ्याने आटपाडी नगरपंचायत समोर आपली गाडी उभा करून मोठ्याने ओरडून थेट ग्राहकांना भाजी विक्री केली. यातून त्यांना चांगला नफा कमावला आहे.

शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदलाच्या परिणामाने पिकावर आलेले अनेक रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातून ही पीक व्यवस्थित आलं तर सर्वात मोठा धक्का शेतकऱ्याला काबाडकष्ट करून पिकवलेला माल बाजार पेठेत विक्रीला नेल्यानंतर त्याच्या मालाला आलेला भाव पाहून येतो. उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. पण या शेतकऱ्याने याला पर्याय शोधत थेट आपल्या गाडीतून भाजी विक्री केली.

या तरुण शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत आलिशान गाडीतून स्वतः मेथीची भाजी विक्री केली. शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत बसतात, पण आपण पिकवलेला माल आपण स्वतः जर विकला तर त्याला हमखास दर मिळतोच. मात्र माल विकत असताना लाज न बाळगता माल विकाल्यास तिप्पट दर मिळत असल्याचा प्रत्ययही यानिमित्ताने शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना आला आहे. वामन यांनी स्वतः विक्री केल्याने त्यांना या भाजी विक्रीतून प्रत्येक पेंडीमागे लिलावापेक्षा तीन ते चार पट दर भेटला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget